25 March 2025 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 26 मार्च 2025; तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल, बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 26 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI FD Interest Rates | एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी अपडेट, सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या FD मध्ये पैसे गुंतवा, मोठा परतावा मिळवा TATA Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून फायद्याचा सल्ला - NSE: TATAMOTORS Rattan Power Share Price | 9 रुपयांचा पेनी स्टॉक, यापूर्वी 586 टक्के परतावा दिला, पॉवर कंपनी फोकसमध्ये - NSE: RTNPOWER IREDA Share Price | 172 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार, इरेडा शेअर टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA Wipro Share Price | विप्रो शेअर मालामाल करणार, CLSA ब्रोकिंग फर्म बुलिश, टार्गेट प्राईस जाणून घ्या – NSE: WIPRO
x

Bandhan Bank Share Price | हा मल्टिबॅगर बँकिंग शेअर स्वस्त झालाय, खरेदी करावा का? तज्ञांनी दिली टार्गेट प्राईस

Bandhan Bank Share Price

Bandhan Bank Share Price | मागील काही दिवसांपासून भारतीय बँकिंग सेक्टरमध्ये बरीच आदळ-आपट पाहायला मिळत आहे. खाजगी क्षेत्रातील ‘बंधन बँक’ चे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीला स्पर्श करून पुन्हा हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहेत. आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी बंधन बँकेचे शेअर्स 0.35 टक्के वाढीसह 188.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या बँकिंग स्टॉक ने नुकताच आपल्या नीचांक किमतीला स्पर्श केला होता. 17 मे 2022 रोजी बंधन बँक स्टॉक 349.55 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर मागील एका वर्षात या स्टॉकमध्ये 36.28 पडझड देखील झाली आहे. (Bandhan Bank Limited)

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NSE इंडेक्सवर ‘बंधन बँक’ चे शेअर्स 195.80 रुपये किमतीवर ओपन झाले होते, आणि 185.75 रुपयांपर्यंत खाली पडले. काल या स्टॉकमध्ये विक्रीचा जबरदस्त दबाव पाहायला मिळाला होता. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 197.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील पाच दिवसात बंधन बँक स्टॉक 10.56 टक्के कमजोर झाला आहे. मागील एका महिन्यात या बँकेच्या शेअरने गुंतवणूकदारांचे 18.54 टक्के नुकसान केले आहे. तर मागील सहा महिन्यात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांचा 27.86 टक्के तोटा केला आहे. YTD आधारे या बँकिंग स्टॉकने लोकांना 21.67 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे

खरेदी, विक्री, होल्ड? :
बंधन बँकेच्या स्टॉकबाबत शेअर बाजारातील तज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. एकूण 28 पैकी 21 तज्ञांनी बंधन बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर 5 तज्ञांनी स्टॉक सध्या होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. फक्त दोन तज्ञ स्टॉक विकण्याचा सल्ला देत आहेत. म्युच्युअल फंड क्षेत्रात नुकत्याच प्रवेश केलेल्या बंधन बँकेचा स्टॉक पुढील एका वर्षात 53 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो, असा अंदाज अनेक तज्ञांनी व्यक्त केला आहे. काही दिग्गज तज्ञांनी हा स्टॉक 310 रुपये टार्गेट प्राइससाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bandhan Bank Share Price on 29 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Bandhan Bank Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या