15 December 2024 11:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
x

Bank Account Alert | एकापेक्षा जास्त बँक अकाउंट वापरत असाल होईल 'हे' नुकसान, लक्षात ठेवा - Marathi News

Highlights:

  • Bank Account Alert
  • सिबिल स्कोरवर होतो परिणाम – SBI Minimum Balance
  • मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो – Minimum Balance in SBI
  • असे लागतील एक्स्ट्रा चार्ज – Axis Bank Minimum Balance
  • तुमचं सॅलरी अकाउंट सेविंग अकाउंट बनेल
Bank Account Alert

Bank Account Alert | अनेक व्यक्तींकडे एकापेक्षा अनेक बँक अकाउंट असतात. काही व्यक्ती महत्त्वाच्या कामांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी एकापेक्षा अनेक बँक अकाउंट ओपन करतात. आता जास्त ठिकाणी बँक अकाउंट ओपन केल्यावर तुम्हाला प्रत्येक बँक खात्यामध्ये थोडेफार पैसे ठेवावे लागतात. त्याचबरोबर जास्त बँक अकाउंटमुळे तुमच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस देखील घेतले जातात.

एवढेच नाही तर तुमचा सिबिल स्कोर देखील खराब होण्याची शक्यता असते. एकापेक्षा अनेक बँक अकाउंट ठेवल्यामुळे तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि तुम्हाला कोणकोणते नुकसान झेलावे लागू शकते याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

सिबिल स्कोरवर होतो परिणाम :
एकापेक्षा अनेक बँक अकाउंट ठेवल्यामुळे तुमचा सिबिल स्कोर म्हणजेच क्रेडिट स्कोर खराब होऊ लागतो. कारण की प्रत्येक बँक अकाउंटमध्ये तुम्हाला मिनिमम बॅलेन्स ठेवायला अडचण निर्माण होते. त्यामुळे जर तुम्ही अनेक बँक अकाउंट ओपन केले असतील आणि सध्या ते तुमच्या कोणत्याही कामाचे नसतील तर, लगेचच बँकमध्ये जाऊन तुमचं अकाउंट बंद करा.

मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो :
एकापेक्षा जास्त बँक अकाउंट ओपन केल्यामुळे तुम्हाला प्रत्येक बँक अकाउंट हँडल करण्यासाठी किंवा सुरू राहण्यासाठी मिनिमम बॅलेन्स ठेवावाच लागतो. असं झाल्यामुळे तुम्हाला गरजेच्यावेळी वापरला जाऊ शकणारा पैसा बँकेमध्ये जमा करायला लागतो. परंतु या मिनिमम बॅलन्सवर तुम्हाला चार ते पाच टक्के रिटर्न दिले जाते.

असे लागतील एक्स्ट्रा चार्ज :
एकाहून अधिक बँक अकाउंट असल्यामुळे तुम्हाला सर्विस चार्ज आणि मेन्टेनन्स बॅलेन्स भरावा लागतो. हे चार्जेस तुम्हाला अत्यंत महागात पडू शकतात. एवढेच नाही तर तुम्हाला बँकांमध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरण्यासाठी देखील पैसे भरावे लागतात. एवढेच नाही तर काही बँकांमध्ये त्या त्या पद्धतीनुसार चार्जेस आकारले जातात. त्यामुळे एकापेक्षा अधिक अकाउंट ओपन करू नका आणि आणि नको त्या चार्गेसला बळी पडू नका.

तुमचं सॅलरी अकाउंट सेविंग अकाउंट बनेल :
काही माहितीच्या आधारावर असं समजतंय की, तुमच्या सॅलरी अकाउंटमध्ये तीन महिने उलटून गेल्यानंतरही पैसे क्रेडिट झाले नाही की, तुमचं सॅलरी अकाउंट आपोआप सेविंग अकाउंटमध्ये बदलतं. ज्यामुळे बँकेचे सर्व डिटेल्स देखील बदलून जातात. वेगवेगळ्या कंपन्यांनी त्यांच्या नियमानुसार सॅलरी अकाउंटचे देखील विविध अकाऊंट बनवले आहेत. तुम्ही तुमचं अकाउंट मेंटेन ठेवले नाही तर, यावर पेनल्टी चार्ज भरावे लागू शकतात. जेणेकरून तुमच्या खात्यामधील पैसे देखील संपू शकतात आणि म्हणूनच एकापेक्षा अधिक बँक अकाउंट ठेवण्यापासून वाचा.

Latest Marathi News | Bank Account Alert 14 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bank Account Alert(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x