12 December 2024 5:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

PNC Infratech Share Price | एक बातमी येताच हा शेअर तेजीत, नेमका स्टॉक प्राईस वाढीचे कारण काय?

PNC Infratech Share Price

PNC Infratech Share Price | जेव्हा एखाद्या कंपनीबद्दल काही सकारात्मक बातमी येते, त्याचा परिणाम कंपनीच्या शेअरवर ही पाहायला मिळतो. असेच काहीसे झाले आहे, ‘पीएनसी इन्फ्राटेक’ कंपनीबद्दल. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह 287.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजीचे मुख्य कारण म्हणजे कंपनीने एक नवीन व्यापारी करार केला आहे. आज बुधवार दिनांक 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.35 टक्के घसरणीसह 281.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (PNC Infratech Limited)

‘पीएनसी इन्फ्राटेक’ कंपनीला नुकताच केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून 819 कोटी रुपये मुल्याचा प्रकल्प मिळाला आहे. या प्रकल्पांतर्गत कंपनीला 49.115 किलोमीटर ते 74.700 किलोमीटरचा चौपदरी रस्ता बनवायचा आहे. ‘पीएनसी इन्फ्राटेक’ कंपनी मुख्याहा हायवे, पूल, फ्लायओव्हर, एअरपोर्ट रनवे बनवण्याचे काम करते.

मागील 6 महिन्यांत ‘पीएनसी इन्फ्राटेक’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 8.01 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याच वेळी ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी ‘पीएनसी इन्फ्राटेक’ कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना आता 10.65 टक्के परतावा मिळाला आहे. ‘पीएनसी इन्फ्राटेक’ कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 352 रुपये प्रति शेअर होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत प्रति शेअर 219 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PNC Infratech Share Price on 29 March 2023.

हॅशटॅग्स

PNC Infratech Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x