1 May 2025 10:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Bank FD Vs Post Office RD | बँक एफडी की पोस्ट ऑफिसची आरडी?, गुंतवणूकीसाठी फायद्याचा पर्याय कोणता, नफ्याचे गणित लक्षात ठेवा

FD Vs RD Benefits

Bank FD Vs Post Office RD | एक योजना आहे ज्यात तुम्हाला खुप कमी रकमेतुन गुंतवणूकीला सुरुवात करता येईल. यात तुमचा खुप फायदा होईल. मात्र नुकसान होण्याची देखील ४० टक्के शक्यता आहे. परंतू मिळणारा फायदा हा तुमच्या रकमेच्या तिप्पट असेल. असे जर कोणी सांगितले तर निश्चीतच सर्वसामान्य माणसं या योजनेकडे पाठ फिरवतात. प्रत्येक सामान्य नागरिकाला जास्त फायदा मिळण्याबरोबर पैशांच्य सुरक्षिततेची जबाबदारी स्विकारणारी योजना हवी असते.

अशात अनेक व्यक्ती एफडी किंवा आरडीमध्ये पैसे गुंतवत असतात. आरडीमध्ये १ ते १० वर्षांच्या गुतवणूकीची मर्यादा दिली जाते. तर एफडीमध्ये सात ते १० वर्षांपर्यंतचा कालावधी असतो. या दोन्ही योजना फायदेशीर आणि सुरक्षीत मानल्या जातात. मात्र यामध्ये देखील कोणती योजना तुमच्या आर्थिक गणितांनुसार सोईस्कर असेल हे माहीत असायला हवे. त्यामुळे या बातमीतून दोन्ही योजनांचे फायदे आणि तोटे जाणून घेऊ.

आरडीचे फायदे काय आणि तोटे काय?
आरडी अल्पावधीत जास्त नफा मिळवून देणारी योजना आहे. यात ५ लाखांची गुंतवणूक करणा-यांना डिपॉझिट इन्शुरन्स आणि गॅरंटी देण्यात येते. शासनाच्या नियमानुसार बॅंक बंद पडल्यास ५ लाख त्या खातेदारकाला दिले जातात. असे प्लॅन रुपी इन्व्हेस्टमेंट सव्हिसचे संस्थापक अनमोल जोशी म्हणाले आहेत.

याच आरडीची दुसरी बाजू पाहिली तर इथे दिर्घ काळासाठी गुंतवणूक करणा-यांना जास्त फायदा मिळत नाही. तसेच तुम्हाला यात आयकर सुट मिळत नाही. व्याजाच्या रकमेकर आरडीमध्ये टॅक्स कापला जातो. यात लॉक इन कालावधी असल्याने तो पुर्ण झाल्याशीवाय पैसे काढता येत नाहीत. जर तुम्ही कालावधी पुर्ण होण्याआधी पैसे काढले तर त्यावर दंड आकारण्यात येतो. आरडीचा जो व्याजदर सुरूवातीला असतो तोच शेवटपर्यंत कायम ठेवला जातो.

एफडी तुमच्या फायद्याची की तोट्याची
एफडीमध्ये केलेली गुंतवणूक देखील नेहमीच सुरक्षित मानली जाते. यात क्युम्युलेटिव्ह इंटरेस्ट आणि नॉन क्युम्युलेटिव्ह इंटरेस्ट हे दोन प्रकार आहेत. यातील पहिल्या प्रकारात मॅच्युरीटीवर मुद्दल आणि चक्रवाढ व्याज दिले जाते. तर दुस-या पर्यायात मासीक आणि त्रैमासीक पध्दतीने व्याज मिळते. व्याजाच्या तुलनेत एफडीपेक्षा आरडी जास्त व्याज देते.

इथे कर सवलतीसाठी वेगळा पर्याय आहे. त्यासाठी तुम्हाला टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक करता येते. यात लॉक इन कालावधी निश्चित केलेला असतो. जर तुम्ही तो कालावआधी मोडून रक्कम काढली तर तुम्हाला दंड भरावा लागतो. जर मोठी रक्कम एकाच वेळी गुंतवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही एफडी पर्याय निवडावा आणि महिना प्रिमियम भरायचा असेल तर आरडी निवडावे. या दोन्ही मध्ये पैसे सुरक्षित राहतात. मात्र दिलेल्या तरतूदी निट न पाळल्यास तुमचे नुकसान होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bank FD Vs Post Office RD which is the best for investment 19 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

FD Vs RD Benefits(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या