
Bank of India Share Price | ‘बँक ऑफ इंडिया’ या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेच्या शेअरमध्ये सोमवारी 6 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली. बँकेने मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. याकाळात बँकेचा नफा दुप्पट वाढला असून, बँकेच्या व्याज उत्पन्नात 37 टक्क्यांची वाढ झाली आहे. मॉर्गन स्टॅनलीने तिमाही निकालानंतर ‘बँक ऑफ इंडिया’ कंपनीच्या स्टॉकवर मजबूत भावना व्यक्त केल्या आहेत. ब्रोकरेज फर्मच्या मते, बँक ऑफ इंडियाच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा पहायला मिळत आहे.
बँक ऑफ इंडिया ने आर्थिक वर्ष 2023 साठी प्रति इक्विटी शेअर 2 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा देखील केली आहे. मागील एका वर्षात या बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 80 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज सोमवार दिनांक 9 मे 2023 रोजी बँक ऑफ इंडियाचे शेअर्स 0.062 टक्के घसरणीवरसह 81.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बँक ऑफ इंडिया शेअरची लक्ष किंमत :
मॉर्गन स्टॅनली फर्मने बँक ऑफ इंडिया च्या शेअरवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन प्रति शेअर लक्ष्य किंमत 125 रुपये जाहीर केली आहे. 5 मे 2023 रोजी बँक ऑफ इंडियाचा शेअर 86 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. पुढील काळात हा स्टॉक सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 45 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.
मागील एका वर्षात बँक ऑफ इंडियाच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 80 टक्के परतावा कमावून दिला आहे. मॉर्गन स्टॅनलेच्या मते बँक ऑफ इंडियाचा नफा अपेक्षेपेक्षा कमी नोंदवला गेला आहे. बँकेचा मूळ महसूल आणि मालमत्तेची गुणवत्ता अपेक्षेपेक्षा कमी नोंदवला गेला असून, मालमत्तेवरील परताव्यात सुधारणा अपेक्षित आहे.
तिमाही कामगिरी :
जानेवारी-मार्च 2023 या तिमाहीत बँक ऑफ इंडियाने115 टक्क्यांच्या वाढीसह 1388 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. बँक ऑफ इंडियाचे निव्वळ व्याज उत्पन्न 37 टक्क्यांच्या वाढीसह 5493 कोटीवर पोहचले आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत बँकेचे बिगर व्याज उत्पन्न देखील दुप्पट होऊन 3,099 कोटी रुपये नोंदवले गेले आहे. एका वर्षापूर्वी बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 1,587 कोटी रुपये होते. बँकेने आर्थिक वर्ष 2023 मध्ये गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 2 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये असून गुंतवणूकदारांना प्रति इक्विटी शेअर 20 टक्के लाभांश वाटप केला जाईल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.