 
						Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रच्या विशेष एफडीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.७५ टक्के व्याज (NSE: MAHABANK) दर आहे. 7.50 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर सर्वसामान्य नागरिकांना अंदाजे 68,501 रुपये व्याज आणि अंदाजे 8,18,501 रुपये मिळतील. मात्र बँक ऑफ महाराष्ट्र शेअर गुंतवणूकदारांना मालामाल करू शकतो. विशेष म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र शेअरची किंमत अवघी 52 रुपये आहे. (बँक ऑफ महाराष्ट्र कंपनी अंश)
9 ते 12 महिन्यांत गुंतवणुकीवर 42% परतावा मिळू शकतो
बँक ऑफ महाराष्ट्र संबंधित गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर ही बातमी अत्यंत फायद्याची आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या देशभरात सुमारे २५०० शाखा आहेत. गेल्या तीन वर्षांपासून बँकेची कामगिरी चांगली आहे. दुसऱ्या तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रचे आर्थिक निकालही चांगले आले आहेत. NIMs आणि NIIs मध्ये वाढ झाली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र शेअर सध्या 52.27 रुपयांच्या आसपास आहे. तज्ज्ञांनी बँक ऑफ महाराष्ट्र शेअरसाठी 72 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 9 ते 12 महिन्यांत गुंतवणुकीवर 42% परतावा मिळू शकतो असे संकेत टेक्निकल चार्टवर दिसत आहेत.मागील ५ वर्षात बँक ऑफ महाराष्ट्र शेअरने गुंतवणूकदारांना 318.16% परतावा दिला आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रची आर्थिक स्थिती भक्कम
दरम्यान, बँक ऑफ महाराष्ट्र ज्याचा घटक आहे त्या निफ्टी PSU बँकेचा निर्देशांक मागील महिन्याभरात सुमारे 0.21% वाढला आहे आणि सध्या निफ्टी PSU बँकेचा निर्देशांक 0.79% वाढून 6534.75 वर बंद झाला आहे. गेल्या महिन्याभरात दैनंदिन सरासरी १५४.४१ लाख शेअर्सच्या तुलनेत आज बँक ऑफ महाराष्ट्र शेअरचे प्रमाण ६४.९६ लाख शेअर्सवर पोहोचले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		