 
						Bank of Maharashtra | सत्तेत आल्यापासून मागील १० वर्षात मोदी सरकारने ७० वर्षात काय केलं असे राजकीय आरोप सातत्याने केले आहेत जे अजूनही सुरूच आहेत. मात्र १० वर्षात मोदी सरकारने नेमकं देशात काय निर्माण केले असा प्रश्न विचारल्यास मोदी भक्त देखील अनुत्तरित होतात.
मागील १० वर्षात काँग्रेस सरकारने स्थापन केलेल्या अनेक नफ्यातील सरकारी कंपन्या देखील मोदी सरकारने खासजी क्षेत्राला विकल्या आहेत. तसेच काँग्रेसच्या काळातील अनेक योजना आणि उपक्रमांना दुसरी नावं देतं लोकांसमोर आणल्या आहेत. आता काँग्रेसच्या काळातील अर्धा डझन सरकारी बँकांमधील हिस्सेदारी खासगी क्षेत्राला विकण्याची मोदी सरकारची योजना असल्याची माहिती समोर आली आहे.
वास्तविक काँग्रेसने निर्माण केलेल्या संस्थानांना विकूनच मोदी सरकार पैसा उभं करतंय हेच मतदारांना अजून उमगलेलं नाही. तसेच उभा केलेला पैसा नेमका कुठे खर्च होतोय याची माहिती RTI मधूला देखील मिळत नाही. हिंदू-मुस्लिम आणि पाकिस्तान ते फिलीस्तीन वादात रमणाऱ्या मतदारांच्या वाट्याला अजून काय येणार याची देखील समाज माध्यमांवर चर्चा सुरु झाली आहे.
येत्या काळात अनेक सरकारी बँकांचे विनिवेश (Bank Disinvestment) होण्याची शक्यता आहे. वास्तविक, केंद्र सरकार अनेक सरकारी बँकांमधील आपला हिस्सा विकण्याच्या विचारात आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील 5-10% हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. त्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यात येत आहे.
मोदी सरकार या बँकांमधील हिस्सा विकू शकते
इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार, मोदी सरकार 6 सरकारी बँकांमधील 10% पर्यंत हिस्सा विकू शकते ज्यात त्यांचा हिस्सा 80% पेक्षा जास्त इक्विटी आहे. या बँकांमधील हिस्सा विकण्यासाठी सरकार लवकरच सविस्तर आराखडा तयार करेल, असे सूत्रांच्या हवाल्याने वृत्तात म्हटले आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रसहित 6 सरकारी बँकांचा समावेश
बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युको बँकेकडे ८० टक्क्यांहून अधिक सरकारी मालकी आहे. म्हणजेच सरकार या बँकांमधील आपला हिस्सा विकू शकते.
काय आहे मोदी सरकारचा प्लॅन?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार हे शेअर्स ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकू शकते. वास्तविक, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या समभागांच्या किमतीत झालेल्या झपाट्याने झालेल्या वाढीचा फायदा सरकार घेऊ पाहत आहे. सरकारी बँकांनी चांगली कामगिरी केली असून बुडीत कर्जे कमी झाली आहेत, त्यामुळे त्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे.
निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक 34% वधारला आहे, जो मागील वर्षी निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्समध्ये 6.9% वाढला होता. या कालावधीत बेंचमार्क निफ्टी ५० ६.४ टक्क्यांनी वधारला होता. सोमवारी निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक 2.64% वधारला, तर निफ्टी 50 82 अंकांनी म्हणजेच 0.42% घसरून 19,443.55 वर बंद झाला.
Disclaimer : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		