
Post Office Scheme| आज या लेखात आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका योजनेबद्दल माहिती देणार आहोत, जी तुमचे पैसे दुप्पट करू शकते. पोस्ट ऑफिसच्या इतर योजनेच्या तुलनेत ही सर्वात जास्त परतावा कमावून देणारी योजना आहे. या योजनेत, तुम्हाला फक्त 170 रुपये जमा करावे लागतील, आणि योजनेच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला 19 लाख रुपयांचा भरघोस व्याज परतावा दिला जाईल.
योजनेबद्दल थोडक्यात :
इंडिया पोस्टने आपल्या ग्रामीण भागातील ग्राहकांना लक्षात ठेवून ही योजना तयार केली आहे. मुख्यतः ग्रामीण भागात राहणाऱ्या, आणि अल्प उत्पन्न असणाऱ्या लोकांना विचारात घेऊन ही योजना तयार करण्यात आलो होती. आपण ज्या योजनेची चर्चा करत आहोत, तिचे नाव आहे ‘ग्राम सुमंगल ग्रामीण पोस्टल जीवन विमा योजना’. या योजनेत तुम्ही रोज 170 रुपये जमा करून दीर्घकाळात 19 लाखांपर्यंत परतावा कमवू शकता. पोस्ट ऑफीसच्या या योजनेत पॉलिसी धारकाला मुदतपूर्तीवर सर्व पैसे परताव्यासह परत दिले जातात. म्हणजेच, तुम्ही गुंतवलेली रक्कम त्यात व्याज परतावा जोडून तुमच्या खात्यात जमा केली जाते.
पॉलिसीसाठी वयोमर्यादा :
ग्राम सुमंगल योजनेत, पॉलिसीधारकाला योजनेच्या परिपक्वतेवर बोनसही दिला जातो. या योजनेत गुंतवणूक करताना तुम्हाला 15 वर्षे आणि 20 वर्ष मुदतीचे दोन पर्याय उपलब्ध करून दिले जातील. तुम्ही यापैकी एक कालावधी निवडू शकता. ग्राम सुमंगल योजनेची पॉलिसी घेण्यासाठी वयोमर्यादा किमान 19 वर्षे ते कमाल 45 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
20 वर्षात किती परतावा मिळेल :
ग्राम सुमंगल योजने वीस वर्ष गुंतवणूक केल्यास तुम्ही किती पैसे कमवू शकता, हे एका उदाहरणासह समजून घेऊ. समजा तुमचे सध्याचे वय 25 वर्ष आहे. तुम्ही तुमच्यासाठी 10 लाखांची विमा रक्कम खरेदी करण्यास इच्छुक आहात. जर तुम्ही पॉलिसीची मुदत 15 वर्षे निश्चित केली तर 170 रुपये प्रतिदिन प्रमाणे तुम्हाला 6793 रुपये निव्वळ मासिक प्रीमियम भरावा लागेल. जर तुम्ही पॉलिसीची मुदत 20 वर्ष ठेवली तर तुम्हाला 5121 रुपये मासिक प्रीमियम भरावा लागेल.
20 वर्षांनंतर मिळणारा फायदा :
जर समजा तुम्ही 20 वर्षांची पॉलिसी घेतली तर तुम्हाला 8 वर्षे, 12 वर्षे आणि 16 वर्षांच्या अटींवर 20-20-20 टक्के दराने परतावा दिला जाईल. उर्वरित 40 टक्के रक्कम बोनससह योजनेच्या परिपक्वतेवर तुमच्या खात्यात वर्ग केली जाईल. जर योजना चालू असताना पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर, त्या व्यक्तीच्या नॉमिनीला बोनसच्या रकमेसह पूर्ण विमा रक्कम दिली जाईल.
19 लाख रुपये परतावा :
जर तुमचा पॉलिसीचा प्रिमियम टर्म 15 वर्ष कालावधीसाठी असेल तर तुम्हाला मिळणारी बोनसची रक्कम 15X4500X10 = 6.75 लाख असेल. जर तुमचा प्रीमियम टर्म 20 वर्षे असेल तर तुम्हाला मिळणारी बोनसची रक्कम 20X4500X10 = 9 लाख रुपये असेल. एकूण जीवन विमा रक्कम 10 लाख रुपये असल्याने, 15 वर्षानंतर तुम्हाला 16.75 लाख रुपये, आणि 20 वर्षांनंतर मॅच्युरिटी रक्कम म्हणून एकूण 19 लाख रुपये मिळेल.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.