
Bank of Maharashtra Share | भारतीय शेअर बाजार शुक्रवारी दिनांक 12 जानेवारी रोजी आपल्या नवीन उच्चांकावर पोहचला होता. सेन्सेक्स निर्देशांक 72,720 अंकावर आणि निफ्टी-50 निर्देशांक 21,928 अंकावर ट्रेड करत होते. ट्रेडिंग सेशनच्या शेवटी सेन्सेक्स निर्देशांक 847 अंकांच्या वाढीसह 72,568 अंकावर पोहचला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 260 अंकांच्या वाढीसह 21,908 वर पोहचला होता.
बँक ऑफ महाराष्ट्र शेअर – शुक्रवारी एकदिवसात 5.11 टक्के परतावा दिला
शेअर बाजारातील प्रचंड तेजीमुळे काही बँकिंग स्टॉकमध्ये उसळी पाहायला मिळाली होती. बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स तर अप्रतिम वाढीसह ट्रेड करत होते. एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने पुढील 3 महिन्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. टेक्निकल चार्टवर बँक ऑफ महाराष्ट्र स्टॉक मजबूत वाढीचे संकेत देत आहे. शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र स्टॉक 5.11 टक्के वाढीसह 48.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
तज्ञांच्या मते, पुढील काही आठवड्यात बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स 54 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. HDFC सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स खरेदी केल्यास चांगला फायदा होऊ शकतो. पुढील 3 महिन्यात या बँकेच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळू शकते.
तज्ञांनी बँक ऑफ महाराष्ट्र स्टॉकवर पहिली टार्गेट प्राइस 51 रुपये आणि दुसरी टारगेट प्राइस 54 रुपये निश्चित केली आहे. तज्ञांनी गुंतवणूकदारांना बँक ऑफ महाराष्ट्रचे शेअर्स खरेदी करताना 45 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. मागील 6 महिन्यांत बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 58 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.
ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळू शकते. मागील अनेक महिन्यांपासून हा स्टॉक सतत उच्चांक पातळी स्पर्श करत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र स्टॉक सध्या आपल्या 50 दिवसांच्या SMA लेव्हलच्या ट्रेड करत आहे. या बँकिंग स्टॉकमध्ये चांगल्या व्हॉल्यूमच्या आधारावर, 50 दिवसांच्या SMA आणि 43-47.75 रुपये किमतीच्या ब्रेकआउटमधून शानदार बाउन्सबॅक पाहायला मिळाला होता.
पुढील काही आठवडाभरात या स्टॉकमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने तज्ञांनी तत्काळ शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील सहा महिन्यात बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 55.06 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.