
BCL Industries Share Price | बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांच्या कालावधीत या कंपनीचे शेअर्स 40 रुपये किमतीवरून वाढून 500 रुपयेवर पोहोचले आहेत. 27 ऑक्टोबर 2023 रोजी कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 1 रुपयेच्या 10 शेअर्समध्ये विभाजित केले आहेत.
या कंपनीने आपले चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले असून कंपनीने 366.30 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी बीसीएल इंडस्ट्रीज स्टॉक 1.84 टक्के वाढीसह 52.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील तिमाहीमध्ये बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने 333 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर मागील आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर 2022 तिमाहीत या कंपनीने 425.09 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. या तिमाहीत बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने 21.90 कोटी रुपये PBT नोंदवला आहे, जो मागील तिमाहीत 19.70 कोटी रुपये नोंदवला गेला होता. त
मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने 7.36 कोटी रुपये PBT नोंदवला होता. जर आपण चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीच्या नफ्याबद्दल बोललो तर तो 12.83 कोटी रुपये होता जो मागील तिमाहीत 15.19 कोटी रुपये होता आणि गेल्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 5.66 कोटी रुपये होता.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 3.57 टक्क्यांच्या वाढीसह 53.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1380 कोटी रुपये आहे. बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 59 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 28 रुपये होती.
शेअरबाबत तज्ज्ञांनी काय म्हटले
तज्ज्ञांच्या मते बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा देऊ शकतात. सध्या जर तुम्ही गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर तुम्ही बीसीएल इंडस्ट्रीज स्टॉक खरेदी करू शकता. या कंपनीने पुढील 2 वर्षात इथेनॉलचे उत्पादन प्रति दिवस 850 किलोलिटरपर्यंत वाढवण्याचे लक्ष निश्चित केले आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये इथेनॉलची मागणी वाढत आहे, म्हणून कंपनीने पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे एक अत्याधुनिक प्लांट सुरू केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.