14 December 2024 4:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

BEL Share Price | मल्टिबॅगर BEL शेअर पुन्हा फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - Marathi News

Highlights:

  • BEL Share PriceNSE: BEL – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश
  • PSU कंपनीबाबत
  • कंपनीच्या तिमाही निकालाची तारीख आणि वेळ
  • PSU कंपनीची ऑर्डरबुक मजबूत
  • बीईएल शेअरची स्थिती
BEL Share Price

BEL Share Price | सध्या शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, संरक्षण क्षेत्रातील सरकारी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने (NSE: BEL) आपल्या आर्थिक तिमाही कामगिरीचे निकाल जाहीर होणार असल्याचे जाहीर केले आहे. PSU कंपनीने याबाबत सविस्तर माहिती मीडिया रिपोर्टला सुद्धा दिली आहे. मंगळवार दिनांक 08 ऑक्टोबर 2024 रोजी हा शेअर 3.98 टक्के वाढून 278 रुपयांवर ट्रेड करत आहे. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)

PSU कंपनीबाबत
भारत सरकारची PSU कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भारतीय लष्कर, नौदल आणि एअर फोर्ससाठी अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि प्रणाली तयार करण्याचे काम करते. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी होमलॅण्ड सिक्युरिटी सोल्युशन्स, स्मार्ट सिटीज, ई-गव्हर्नन्स सोल्युशन्स, स्पेस इलेक्ट्रॉनिक्स अशा संरक्षण विषयक सेवांमध्ये कंपनी अग्रगण्य मानली जाते.

कंपनीच्या तिमाही निकालाची तारीख आणि वेळ
गेल्या महिन्यातील 30 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीसाठी अनऑडिटेड स्टँडअलोन आणि कंसॉलिडेटेड फायनान्शियल रिझल्ट्सवर विचार करून त्याला मंजुरी देण्यासाठी शुक्रवार, दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडणार आहे. ही कंपनी सामान्यत: स्टॉक मार्केटच्या वेळेतच आपले तिमाही निकाल जाहीर करते, असा यापूर्वीचा अनुभव सांगतो.

PSU कंपनीची ऑर्डरबुक मजबूत
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीने सोमवारी आपल्या ऑर्डरबुकचे आकडे देखील जाहीर केले. महत्वाचे म्हणजे ११ सप्टेंबर रोजी देण्यात आलेल्या शेवटच्या माहितीनंतर PSU कंपनीला ५०० कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. त्या ऑर्डरबुकनुसार ईएमआय शेल्टर, इंटिग्रेटेड एअर कमांड अँड कंट्रोल सिस्टिम नोड्ससाठी एएमसी, गन सिस्टीमसाठी अपग्रेड/स्पेअर्स, रडारसाठी स्पेअर्स, कम्युनिकेशन सिस्टीम या आधुनिक सामग्रीचा समावेश आहे. त्यामुळे आता या सरकारी कंपनीने चालू आर्थिक वर्षात एकूण ७,६८९ कोटी रुपयांच्या ऑर्डर प्राप्त केल्याचे एक्सचेंजला दिलेल्या फायलिंगमध्ये नमूद केले आहे.

बीईएल शेअरची स्थिती
बीएसईवर सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचा शेअर सोमवारी 3.55% घसरून 267 रुपयांवर बंद झाला. दरम्यान, BSE वरील अधिकृत आकडेवारीनुसार, मागील आठवडाभरात या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 6% घसरण झाली आहे. तसेच 2024 मध्ये या सरकारी कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना 44% परतावा दिला आहेत. तर गेल्या २ वर्षांत हा परतावा 151.62% इतका होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Share Price 08 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

BEL Share Price(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x