 
						BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत आहेत. मागील आठवड्यात गुरुवारी या कंपनीचे (NSE: BEL) शेअर्स 3.13 टक्क्यांच्या घसरणीसह 274 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. FED बैठकीनंतर भारतीय शेअर बाजारात तेजीचे व्यवहार पाहायला मिळाले होते. (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश)
इंडेक्समध्ये मजबूती राहील
सध्या निफ्टी इंडेक्स 25400 अंकावर ट्रेड करत आहे. जोपर्यंत निफ्टी 25350-25400 च्या रेंजमध्ये राहील तोपर्यंत इंडेक्समध्ये मजबूती राहील असे तज्ञांनी सांगितले आहे. आज सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी बीईएल स्टॉक 2.18 टक्के वाढीसह 283.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
स्टॉक टेक्निकल चार्ट
मागील काही महिन्यांपासून बीईएल कंपनीच्या शेअर्समध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील तीन महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना नकारात्मक परतावा दिला आहे. गुरुवारच्या व्यवहारात या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या घसरणीसह 267.20 रुपये या नीचांक किंमत पातळीवर पोहचले होते. त्यांनतर दिवसा अखेर हा स्टॉक 272.75 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. टेक्निकल चार्टवर बीईएल स्टॉकने 260-270 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे.
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस फर्म – BUY रेटिंग
जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस फर्मच्या तज्ञांच्या मते, बीईएल कंपनीची ऑर्डर बुक मजबूत आहे. तज्ञांच्या मते, या स्टॉकचा दीर्घकालीन दृष्टीकोन सकारात्मक आहे. 10 जुलै रोजी बीईएल स्टॉक 340.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होता. या किमतीवरून हा स्टॉक 20 टक्क्यांनी खाली आला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 47 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 95 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 5 वर्षांत 685% परतावा दिला
मागील दोन वर्षांत या कंपनीचे शेअर्स 146 टक्के आणि 3 वर्षांत 300 टक्के वाढले आहेत. मागील 5 वर्षांत बीईएल स्टॉक 685 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. बीईएल ही भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली व्यवसाय करणारी सरकारी संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय बेंगळुरूमध्ये आहे. बीईएल ही कंपनी भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलासाठी इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि प्रणाली बनवण्याचे काम करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		