
BEL Share Price | भारतीय शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या डिफेन्स कंपन्याचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 20 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. 4 जून रोजी एका दिवसात डिफेन्स सेक्टरमधील शेअर्सने 21 टक्केचा तळ गाठला होता. शुक्रवारी एका दिवसात भारतीय शेअर बाजारातील डिफेन्स सेक्टरमधील पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, माझगाव डॉक शिपबिल्डर्स, कोचीन शिपयार्ड, भारत डायनॅमिक्स आणि भारत फोर्ज लिमिटेड यां कंपनीच्या शेअर्सने 20 टक्क्याची वाढ नोंदवली आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
संरक्षण क्षेत्रातील निर्यात वाढीमुळे डिफेन्स कंपन्यांना मोठी चालना मिळाली आहे. शुक्रवार दिनांक 14 जून 2024 रोजी बीईएल स्टॉक 2.92 टक्के वाढीसह 309.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी जाहीर केले की, भारत सरकार पुढील 5 वर्षात संरक्षण क्षेत्रातील निर्यात व्यवसाय 50,000 कोटी रुपयेपर्यंत वाढवणार आहे. सशक्त आणि आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आणि संरक्षण उत्पादनात स्वावलंबी होण्यासाठी भारत सरकार मोठी गुंतवणुक करणार आहे.
भारतीय डिफेन्स उद्योगांनी आतापर्यंत 21000 कोटी रुपयेपेक्षा जास्त किमतीचे संरक्षण उपकरण निर्यात केले आहेत. पुढील पाच वर्षात भारतीय डिफेन्स एक्सपोर्ट 50000 कोटी रुपयेवर नेण्याचे लक्ष्य सरकारने निर्धारित केले आहे. पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 20 टक्के वाढीसह 1157.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मागील एका महिन्यात पारस डिफेन्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमवून दिला आहे. बीईएमएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 17 टक्क्यांच्या वाढीसह 4722.20 रुपये किमतीवर पोहोचले होते. माझगाव डॉक स्टॉक 14 टक्के वाढीसह 3874.65 रुपये किमतीवर पोहचला होता. भारत डायनॅमिक्स कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 6 टक्के वाढीसह 1582.35 रुपये किमतीवर पोहोचले होते.
दरम्यान भारत फोर्जे आणि कोचीन शिपयार्ड स्टॉक एका दिवसात 5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत होता. मॉर्डर इंटेलिजन्स फर्मच्या मते 2024 मध्ये भारताच्या डिफेन्स व्यवसायाचा आकार 17.40 अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. 2029 पर्यंत हे प्रमाण 23.05 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. 2024-2029 दरम्यान भारतीय डिफेन्स बाजार 5.79 टक्के CAGR ने वाढेल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.