
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर क्लोज झाला आहे. YTD आधारे या कंपनीचे शेअर्स 65 टक्के वाढले आहेत. मागील एका वर्षात बीईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 141.56 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 340.35 रुपये होती. आज सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी बीईएल स्टॉक 2.45 टक्के वाढीसह 313.80 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
नुकताच बीईएल कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना प्रति इक्विटी शेअर 0.80 पैसे अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. अंतिम लाभांश वाटप करण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. या कंपनीच्या संचालक मंडळाने 20 मे 2024 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत, गुंतवणुकदारांना शेअरच्या दर्शनी किमतीवर 80 टक्के म्हणजेच 0.80 पैसे प्रति इक्विटी शेअर अंतिम लाभांश वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. यासह जून 2024 ला संपलेल्या तिमाहीमधील आर्थिक कामगिरीबाबत चर्चा करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने 29 जुलै 2024 रोजी बैठक आयोजित केली आहे.
मागील काही काळात बीईएल या सरकारी कंपनीला 25.75 दशलक्ष युरो मूल्याच्या निर्यात ऑर्डर मिळाल्या आहेत. याव्यतिरिक्त, कंपनीने देशातर्गत ग्राहकांकडून 192 कोटी रुपये मूल्याच्या ऑर्डर मिळाले असल्याची माहिती दिली आहे. या ऑर्डर्स अंतर्गत कंपनीला दळणवळण उपकरणे, एन्क्रिप्टर्स, स्पेअर्स आणि रडार, फायर कंट्रोल सिस्टीम इत्यादी सेवा प्रदान करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी बीईएल स्टॉक 2.30 टक्क्यांच्या घसरणीसह 306.30 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
मागील दोन वर्षांत बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 260.57 टक्के आणि तीन वर्षांत 394.43 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 835.99 टक्के वाढली आहे. मागील दहा वर्षात बीईएल स्टॉक 1536.22 टक्के वाढला आहे. ब्रोकरेज हाऊस कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या तज्ञांनी बीईएल स्टॉक 326 रुपये किमतीवर जाऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.