
BEL Share Price | बीईएल या सरकारी कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून तेजी-मंदीच्या गर्तेत अडकले आहेत. जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीज आणि UBS ने जून तिमाही निकालानंतर बीईएल कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राइस वाढवली आहे. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह 325.20 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक 326.55 रुपये किमतीवर पोहचला होता. याच ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचे 1.90 कोटी शेअर्स ट्रेड झाले होते. ( बीईएल कंपनी अंश )
बीईएल स्टॉक आपल्या 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांच्या SMA पेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी बीईएल स्टॉक 0.63 टक्के घसरणीसह 316.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. जून तिमाहीत बीईएल कंपनीचा निव्वळ नफा 46 टक्क्यांच्या वाढीसह 776.14 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 530.84 कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता.
तिमाही दर तिमाही आधारावर बीईएल कंपनीचा निव्वळ नफा 55 टक्क्यांच्या घसरणीसह 1,783.5 कोटी रुपयेवर आला आहे. जून तिमाहीत या कंपनीचा महसूल 19.6 टक्क्यांच्या वाढीसह 4,198.77 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत कंपनीने 3,510.84 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. 1 जुलै 2024 रोजी या कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 76,705 कोटी रुपये होता.
बीईएल कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये 56,500 कोटी रुपये मूल्याची 3 वर्षांची निर्यात ऑर्डर पाइपलाइन कंपनीसाठी सकारात्मक बाब आहे. Jefferies फर्मने बीईएल स्टॉकवर BUY रेटिंग देऊन 370 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी वाढू शकतो. UBS फर्मने बीईएल स्टॉकवर न्यूट्रल रेटिंग देऊन 340 रुपये टारगेट प्राइस जाहीर केली आहे.
2022 मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 2:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. त्यापूर्वी कंपनीने 2017 मध्ये पात्र शेअर धारकांना 1:10 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. मागील तीन महिन्यांत बीईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 37 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 71 टक्के वाढली आहे. तर मागील एका वर्षात हा स्टॉक 147 टक्के मजबूत झाला आहे. बीईएल कंपनीच्या शेअर्सने मागील दोन वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 254 टक्के, तीन वर्षात 423 टक्के, आणि पाच वर्षात 880 टक्के नफा कमावून दिला आहे. बीईएल या सरकारी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,35,265.23 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.