
Gold Rate Today | वायदा बाजारात आज गुरुवारी सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) जून 2024 सीरिज कॉन्ट्रॅक्टमध्ये डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 118 रुपये म्हणजेच 0.17 टक्क्यांनी घसरून 71222.00 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
सराफा बाजारातही सोन्याचा भाव घसरला
परिणामी सराफा बाजारात देखील आता सोन्याचा भाव खाली आलेला दिसेल. मागील सत्रात एप्रिल कॉन्ट्रॅक्ट गोल्डचा दर 71340.00 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर ऑगस्ट 2024 मध्ये फ्युचर्स डिलिव्हरी सोन्याचा भाव 138 रुपये म्हणजेच 0.19 टक्क्यांनी घसरून 71475.00 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. मागील सत्रात जून महिन्यात सोन्याचा दर 71613.00 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
आज वायदा बाजारात चांदीचा भाव
त्याचप्रमाणे एमसीएक्सवर मे 2024 मध्ये डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 170 रुपये म्हणजेच .21 टक्क्यांनी वधारून 82620.00 रुपये प्रति किलो होता. मागील सत्रात मे महिन्यात चांदीचा भाव 82450.00 रुपये प्रति किलो होता.
त्याचप्रमाणे जुलै 2024 सीरिजमधील डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 167 रुपये म्हणजेच 0.2 टक्क्यांनी वाढून 84012.00 रुपये प्रति किलो झाला. मागील सत्रात जुलै कॉन्ट्रॅक्टसाठी चांदीचा भाव 83845.00 रुपये प्रति किलो होता.
सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव
99.9 टक्के शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा विचार केला तर तो 71,823 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. तर तो 72,048 रुपये प्रति 10 ग्रॅम स्तरावर उघडला. याशिवाय 99.5 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा बंद भाव 71,535 रुपये होता, तर तो 71,559 रुपयांवर उघडला.
22 कॅरेट सोन्याचा भाव
आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 65,790 रुपयांवर बंद झाला असून तो 65,996 रुपयांवर खुला झाला आहे. म्हणजेच बाजार उघडण्यापासून ते बंद होईपर्यंत त्यात 258 रुपयांची वाढ दिसून आली आहे.
18 कॅरेट सोन्याचा भाव
18 कॅरेट सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 53867 रुपयांच्या भावाने तो उघडला आणि बाजार बंद झाला तेव्हाही त्याची किंमत 54,036 रुपये होती.
14 कॅरेट सोन्याचा भाव
तर 14 कॅरेट सोन्याचा भाव 42,148 रुपयांवर बंद झाला तर त्याची ओपनिंग किंमत 42,017 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.