
BEL Share Price | मंगळवार, 14 जानेवारी 2025 रोजी पीएसयू भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी शेअरमध्ये तेजी पाहायला मिळाली. मंगळवारी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शेअर 2.16 टक्क्यांनी वधारून 265.20 रुपयांवर पोहोचला होता. मंगळवारी दिवसभरात भेल कंपनी शेअरने 268.50 रुपयांचा उच्चांक गाठला होता. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शेअर्समध्ये तेजीचे कारण एक लेटेस्ट अपडेट आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या डिफेन्स कंपनीला ५६१ कोटी रुपयांचा रुपयांचा नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. विशेष म्हणजे 23 डिसेंबर 2024 नंतर कंपनीला हा दुसरा मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. विशेष म्हणजे चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला १० हजार ३६२ कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत.
भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सप्टेंबर तिमाही निकाल
सप्टेंबर तिमाहीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या निव्वळ नफ्यात ३५.२ टक्क्यांनी वाढला आहे. सप्टेंबर तिमाहीत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीला एकूण 1450.90 कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता.
भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने किती परतावा दिला
भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने मागील ५ दिवसात 5.84 टक्के परतावा दिला आहे. गेल्या १ महिन्यात या शेअरने 16.13% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 19.98% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 40.58% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने 632.60% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरने 120,445.45% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.