
Bharat Electronics Share Price | ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’ या सरकारी मालकीच्या कंपन्यांच्या शेअर्सने 22 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. ज्या लोकांनी या कंपनीच्या शेअरमध्ये 62,000 रुपये लवकर होते, ते लोक आता करोडपती झाले आहेत. शेअर बाजारातील जाणकारांच्या मते ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनीच्या शेअरमध्ये पुढील काळात जबरदस्त वाढ होऊ शकते. कंपनीच्या ऑर्डर बुकमध्ये ज्या तेजीत वाढ होत आहे, आणि आव्हानांपुढे न झुकता कंपनीने सात वर्षांपासून प्रॉफिट मार्जिन कायम ठेवला आहे, त्यामुळे शेअर बाजारातील तज्ञ स्टॉकबाबत सकारात्मक आहेत. तज्ज्ञांच्या मते भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात 130 रुपये लक्ष किंमत स्पर्श करू शकतात. गुरूवार दिनाक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.15 टक्के घसरणीसह 100.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Bharat Electronics Limited)
आर्थिक वर्ष 2022-23 हे ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनीसाठी चांगले होते. मागील आर्थिक वर्षात BEL कंपनीची वार्षिक विक्री 15 टक्क्यांच्या वाढीसह 17,300 कोटी रुपयेवर पोहचली होती. मागील आर्थिक वर्षात कंपनीला 20,200 कोटी रुपयेच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. त्याच वेळी कंपनीचा निर्यातीचा वाटा वार्षिक 40 टक्केपेक्षा अधिक होता. कंपनीच्या महसुलात निर्यातीचा वाटा 2 टक्के होता. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये BEL कंपनीला 75.7 दशलक्ष किमतीच्या निर्यात ऑर्डर मिळाल्या होत्या. आर्थिक वर्षाच्या शेवटी कंपनीला प्रचंड मोठ्या ऑर्डर मिळाल्या ज्यामुळे कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 60,500 कोटी रुपये झाला आहे.
ब्रोकरेज फर्म शेअरखानने BEL कंपनीच्या शेअरवर 120 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तर ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने मजबूत ऑर्डर बुक वाढ आणि वाढती विक्री याचा विचार करून शेअरची लक्ष किंमत 130 रुपये निश्चित केली आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्सने दीर्घ काळात आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. 10 ऑगस्ट 2001 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 64 पैशांवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 100.90 रुपये किमतीवर आला आहे. 22 वर्षापूर्वी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये ज्या लोकांनी 64,000 रुपये लावले होते, त्याचे पैसे 158 पट अधिक वाढले आहेत.
11 मे 2022 रोजी BEL कंपनीचे शेअर्स 71.86 रुपये या आपल्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. अवघ्या चार महिन्यांत शेअरची किंमत 60 टक्क्यांनी वाढली आणि 15 सप्टेंबर 2022 रोजी स्टॉक 115 रुपये या आपल्या वार्षिक उच्चांक किंमत पातळीवर पोहचला होता. सध्या हा स्टॉक आपल्या उच्चांक किंमत पातळीवरून 12 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. मात्र तज्ञांना विश्वास आहे की, पुढील काळात हा स्टॉक 29 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.