 
						Bharat Electronics Share Price | सध्या जर तुम्ही गुंतवणुकीसाठी मल्टीबॅगर स्टॉक शोधत असाल, तर तुम्ही भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक कर्ज शकता. या कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना उत्कृष्ट परतावा कमावून दिला आहे. पुढील काळात या कंपनीचे शेअर्स तेजीत येण्याची शक्यता आहे. नुकताच भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला 5900 कोटी रुपये मूल्याचे दोन मोठे ऑर्डर मिळाले आहेत. (Bharat Electronics Share)
22 जून 2023 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 127.35 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के वाढीसह 123.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Bharat Electronics Limited)
भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे बाजार भांडवल 90,239.22 कोटी रुपये आहे. या कंपनीला नुकताच 5900 कोटी रुपये मूल्याचे दोन ऑर्डर्स मिळाले आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला आकाश वेपन सिस्टीमच्या 2 रेजिमेंटसाठी BDL कडून ऑर्डर देण्यात आली आहे. या ऑर्डरचे मूल्य 3914 कोटी रुपये आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला 1984 कोटी रुपयांची दुसरी ऑर्डर मिळाली आहे.
1 एप्रिल 2023 रोजी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या ऑर्डर बुकचे मूल्य 60,690 कोटी रुपये होते. या ऑर्डरसह कंपनीचे सध्याचे ऑर्डर बुकचे मूल्य 66590 कोटी रुपये झाले आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने 1 रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअरवर 0.60 रुपये अंतिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे.
स्टॉकची कामगिरी
भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्सनी मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअर्सने लोकांना 28 टक्के परतावा परतावा कमावून दिला आहे. 2023 यावर्षी आतापर्यंत या शेअरने लोकांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे शेअर्स 63 टक्क्यांनी वाढले आहेत. तर मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 360 टक्के नफा कमावून दिला आहे.
कंपनीबद्दल थोडक्यात
भारतीय संरक्षण सेवांच्या विशेष इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 1954 साली भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची स्थापना करण्यात आली होती. भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीची स्थापना CSF फ्रान्सच्या सहकार्याने करण्यात आली होती. 2022-2023 या आर्थिक वर्षात भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला भारत सरकार आणि संरक्षण मंत्रालयाकडून मोठ्या ऑर्डर देण्यात आल्या होत्या, यामुळे कंपनीला खूप फायदा होणार आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		