20 September 2024 5:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
L&T Share Price | L&T कंपनीची ऑर्डर बुक मजबूत झाली, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC शेअर्स खरेदीला गर्दी, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, फायद्याची अपडेट - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell? - Marathi News Smart Investment | सरकारी योजनेत अवघ्या 200 रुपयांची बचत, मिळेल 28 लाख रुपयांपर्यंत परतावा, फायदा घ्या - Marathi News EPFO Login | पगारदारांनो, दरमहा एवढी EPF गुंतवणूक करा; मिळेल 3 ते 5 कोटींचा EPF फंड, फायदा लक्षात घ्या - Marathi News Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत नवीन अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, फायदा घ्या - Marathi News BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर BUY करावा की Sell - Marathi News
x

BHEL Share Price | PSU शेअर्स पुन्हा तेजीत येणार? BHEL शेअर मोठा परतावा देण्याचे संकेत, कमाईची मोठी संधी

BHEL Share Price

BHEL Share Price | बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज मंगळवार दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी बीएचईएल स्टॉक 2.76 टक्के वाढीसह 299.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. सोमवारी अनेक PSU स्टॉकमध्ये अफाट घसरण पहायला मिळाली होती. आज स्टॉक मार्केट सावरलं आहे. ( बीएचईएल कंपनी अंश )

अमेरिकन अर्थव्यवस्थेबाबत काही नकारात्मक बातम्या आल्याने जागतिक गुंतवणूक बाजार किंचित सुस्त झाला आहे. तसेच जगात अनेक देश युद्धाची तयारी करत आहे. त्यामुळे परकीय गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

सोमवारी बीएसई PSU इंडेक्स आणि CPSE निर्देशांक सुरुवातीच्या काही तासात 4 टक्क्यांनी घसरले होते. जुलै महिन्यात यूएसमध्ये नोकऱ्यांच्या निर्मितीमध्ये झालेली घट आणि यूएसएच्या बेरोजगारी दरात झालेली तीव्र वाढ यामुळे अमेरिकन इकॉनॉमी मंदीच्या गर्तेत जात आहे. याचा परिमाण भारतीय शेअर बाजारावर देखील पाहायला मिळत आहे.

PSU स्टॉकमध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचा शेअर सोमवारी 7.75 टक्क्यांनी घसरून 544.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि IRCON इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या घसरणीसह अनुक्रमे 178.85 रुपये आणि 265.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. RailTel Corporation of India कंपनीचे शेअर्स देखील 6.9 टक्क्यांच्या घसरणीसह 467.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

NBCC India (Ltd) कंपनीचे शेअर्स सोमवारी 7 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले होते. तर MMTC स्टॉक सुद्धा 6.5 टक्क्यांनी घसरून 100 रुपये किमतीवर आला होता. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळ, पंजाब अँड सिंध बँक आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपन्यांचे शेअर्स सुरुवातीच्या काही तासात 6 टक्क्यांनी घसरले होते.

अँड्र्यू यूल, बीईएमएल लँड ॲसेट्स, बाल्मर लॉरी, कोचीन शिपयार्ड, भेल, भारतीय आयुर्विमा महामंडळ, एनएलसी इंडिया, सेल, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, गार्डन रीच शिपबिल्डर्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदुस्तान एरोनॉटिक्स आणि इतर पीएसयू स्टॉकमध्ये 5 टक्केपेक्षा जास्त घसरण पहायला मिळाली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BHEL Share Price NSE Live 06 August 2024.

हॅशटॅग्स

#BHEL Share Price(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x