 
						BHEL Share Price | सध्या जर तुम्ही ‘BHEL’ म्हणजेच ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड’ कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असला तर, थांबा! गुंतवणुक करण्याआधी शेअर बाजारातील तज्ञाचा सल्ला जाणून घ्या. गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.21 टक्के वाढीसह 71.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मात्र पुढील काळात या सरकारी कंपनीचे शेअर मंदीच्या गर्तेत अडकु शकतात. या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत मंदी येणार असल्याची शंका तज्ञांनी व्यक्त केली आहे. (Bharat Heavy Electricals Ltd)
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते हा स्टॉक पुढील काळात 52.75 रुपयेपर्यंत खाली येऊ शकतो. म्हणजेच हा स्टॉक सध्याच्या ट्रेडिंग किमतीपेक्षा 26.50 टक्के खाली जाऊ शकतो. दुसरीकडे ‘BNP परिबस सिक्युरिटीज’ फर्मने BHEL स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते पुढील काही महिन्यांत या कंपनीच्या शेअरची 125 रुपयांपर्यंत जाऊ शकते. ही किंमत सध्याच्या किमतीपेक्षा 74 टक्के अधिक आहे. शेअर बाजारातील 19 तज्ञापैकी 15 तज्ञ ‘BHEL’ कंपनीचे शेअर्स विकण्याचा सल्ला देत आहेत. फक्त दोन तज्ञांनी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि दोन तज्ञ स्टॉक तत्काळ विकण्याचा सल्ला देत आहेत.
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते BHEL कंपनीचे शेअर्स 51.67 रुपयांपर्यंत मध्यम श्रेणीत ट्रेड करु शकतात. ही किंमत सध्याच्या किमतीपेक्षा 28 टक्के खाली आहे. शेअर मध्ये आणखी मंदी आल्यास स्टॉक 30 रुपये पर्यंत खाली येऊ शकतो. जर आपण शेअरच्या अप्पर किमतीचा विचार केला तर पुढील 12 महिन्यांत हा स्टॉक 39 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. आणि शेअरची किंमत 100 रुपयांनी वाढू शकतो.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		