 
						BHEL Share Price | शुक्रवारी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. या घसरणीचा नकारात्मक परिणाम भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरवर सुद्धा झाल्याचं पाहायला मिळतंय. शुक्रवारी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअर 6.02 टक्क्यांनी घसरून 203.35 रुपयांवर पोहोचला होता.
मात्र, स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनी शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. गेल्या ६ महिन्यात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनी शेअर 38.88 टक्क्यांनी घसरला आहे. मागील वर्षभरात या शेअरमध्ये अवघी २.४५ टक्के वाढ झाली आहे, तर बेंचमार्क बीएसई सेन्सेक्स ७.९८ टक्क्यांनी वधारला आहे. जुलै 2024 मध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनी शेअर 335.40 रुपये या 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला होता. तर जानेवारी 2024 मध्ये शेअरचा 195.60 रुपये हा 52 आठवड्यांच्या नीचांकी स्तर होता.
शेअर टार्गेट प्राईस
रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या मते भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनी शेअर शॉर्ट टर्ममध्ये २०० ते १९० रुपयाच्या रेंजमध्ये दिसू शकतो. तसेच भेल शेअरला २१५ ते २२५ रुपयांच्या पातळीवर रेझिस्टन्स आहे. रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या मते, सध्याच्या पातळीवरून शेअर २२५ रुपये ही पहिली टार्गेट प्राईस गाठू शकतो. मात्र गुंतवणूकदारांनी १९८ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा.
दुसरीकडे, सेबीची नोंदणीकृत स्टॉक मार्केट विश्लेषक ए आर रामचंद्रन यांनी भेल शेअरबाबत सल्ला देताना म्हटले की, ‘भेल शेअर सध्या मंदीचे संकेत देत आहे, परंतु दैनंदिन चार्टवर शेअरला 191 रुपयांवर सपोर्ट आहे. तज्ज्ञांच्या मते, नजीकच्या काळात भेल शेअर २३६ रुपयांची टार्गेट प्राईस गाठू शकतो.
कंपनीने करार केला
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती देताना म्हटले आहे की, ‘भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने इंधन सेल, इलेक्ट्रोलायझर आणि अक्षय ऊर्जा व्यवसायाच्या क्षेत्रात संयुक्त प्रकल्प आणि रिसर्चसाठी ओएनजीसी लिमिटेड कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे. यापूर्वी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने भूतानमध्ये ६ बाय १७० मेगावॅटक्षमतेच्या पुनत्संगचू-२ जलविद्युत प्रकल्पाचे दोन युनिट कार्यान्वित केल्याची माहिती दिली होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		