15 December 2024 9:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

NMDC Share Price | मल्टिबॅगर PSU शेअर खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, शॉर्ट टर्ममध्ये होईल 25 टक्के कमाई - Marathi News

Highlights:

  • NMDC Share PriceNSE: NMDC – एनएमडीसी लिमिटेड कंपनी अंश
  • तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
  • ब्रोकरेज फर्मने काय म्हटले? – NMDC Share
NMDC Share Price

NMDC Share Price | एनएमडीसी लिमिटेड या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळाली होती. शेअर बाजारातील तज्ञांनी एनएमडीसी लिमिटेड (NSE: NMDC) या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. (एनएमडीसी लिमिटेड कंपनी अंश)

तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 291 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. अँटिक स्टॉक ब्रोकिंग फर्मने एनएमडीसी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सवर BUY रेटिंग देऊन 291 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे.

26 सप्टेंबर 2024 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स 234 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर सध्याच्या किमतीच्या तुलनेत 25 टक्के वाढू शकतात. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी एनएमडीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.30 टक्के वाढीसह 235 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. चीनच्या सेंट्रल बँकेने मंद अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कॅश रिझर्वची मर्यादा कमी केली आहे. यामुळे धातूंच्या मागणीला आधार मिळेल आणि धातूंच्या किमती वाढतील. याचा फायदा स्टीलसह धातू क्षेत्रातील सर्व कंपन्यांना होऊ शकतो.

ब्रोकरेज फर्म म्हणते की सरकारी मालकीच्या NMDC कंपनीने सलग दोन तिमाहीत धातूंच्या किमतीत कपात केली आहे. जागतिक लोखंडाच्या किमतींच्या तुलनेत एनएमडीसी लिमिटेड कंपनीने लोखंडाची किंमत 42.6 टक्के कमी केली आहे. नुकताच सेंट्रल बँक ऑफ चायनाने मेटल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांसाठी 284 अब्ज डॉलर्सचे मदत पॅकेज जाहीर केले आहे. यामुळे चीनमध्ये स्टीलचा वापर आणखी वाढू शकतो आणि लोखंडाच्या किमतीला चांगला आधार मिळू शकतो.

ब्रोकरेज फर्मने काय म्हटले?
ब्रोकरेजचे म्हणणे आहे की, जागतिक स्टील असोसिएशनच्या नवीनतम शॉर्ट रेंज आउटलुकमध्ये भारतीय स्टीलची मागणी मजबूत राहण्याची अपेक्षा आहे. 2024 मध्ये ही मागणी 144.3 MT आणि 2025 मध्ये 156 MT मागणी राहण्याची अपेक्षा आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, एनएमडीसी लिमिटेड कंपनीकडे मजबूत ऑपरेशनल कार्यक्षमता, निव्वळ रोख स्थिती आणि चांगली विस्तार योजना आहे. यामुळे स्टॉक आउटलुक पॉझिटिव्ह दिसत आहे.

मागील एका वर्षात एनएमडीसी लिमिटेड स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 20 टक्के वाढली आहे. मागील एका आठवड्यात हा स्टॉक 11 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 286.35 रुपये आहे. तर नीचांक किंमत पातळी 135.30 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 69,118 कोटी रुपये आहे. एनएमडीसी लिमिटेड भारतातील सर्वात मोठी लोह उत्पादक कंपनी आहे. या कंपनीकडे कर्नाटक आणि छत्तीसगड राज्यात अनेक लोह खनिज खाणी आहेत. याशिवाय ही कंपनी मध्य प्रदेशात पन्ना या ठिकाणी हिऱ्याची खाणं देखील हाताळते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NMDC Share Price 28 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

NMDC Share price(20)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x