 
						BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) या सरकारी अभियांत्रिकी कंपनीला महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड (महाजेनको) कडून आठ हजार कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे. कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या बीटीजी (बॉयलर टर्बाइन जनरेटर) पॅकेजसाठी हा करार असल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली. यात उपकरणांचा पुरवठा, बांधकाम आणि नागरी कामांचा समावेश आहे. या वीज केंद्राची क्षमता १३२० मेगावॅट आहे.
नागपूर जिल्ह्यातील कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या बीटीजी पॅकेजसाठी भेलला ७ फेब्रुवारी २०२५ रोजी महानिर्मितीकडून ‘लेटर ऑफ अॅवॉर्ड’ (एलओए) प्राप्त झाले. एलओएच्या तारखेपासून 52-58 महिन्यांत हे कंत्राट पूर्ण होणे अपेक्षित आहे.
तिमाही निकाल कसा लागला?
चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत भेलचा निव्वळ नफा दुपटीने वाढून १३४.७० कोटी रुपये झाला आहे. महसुलात वाढ झाल्याने आपला नफा वाढल्याचे कंपनीने सांगितले. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा नफा 60.13 कोटी रुपये होता. या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 7,385 कोटी रुपये होते, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 5,599.63 कोटी रुपये होते.
सीएलएसए ब्रोकरेज फर्म – टार्गेट प्राइस जाहिर
भेलच्या शेअर्सबद्दल बोलायचे झाले तर शुक्रवारी ते १.१९ टक्क्यांनी घसरून २०२.४१ रुपयांवर बंद झाले. या वर्षी आतापर्यंत शेअर१३ टक्क्यांनी वधारले आहेत, तर १२ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी शेअरहोल्डर्सना १२ टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. सीएलएसए ब्रोकरेज फर्मने ‘कमी’ मानांकनासह भेलवरील आपले लक्ष्य कमी केले आहे, तर मॉर्गन स्टॅनलीने ‘ओव्हरवेट’ भूमिकेसह 352 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.
शेअरहोल्डिंग पॅटर्न
भेलच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार प्रवर्तकांकडे ६३.१७ टक्के हिस्सा आहे. दरम्यान, सार्वजनिक भागधारकांकडे ३६.८३ टक्के हिस्सा आहे. जुलै 2024 मध्ये हा शेअर 335.40 रुपयांवर होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. जानेवारी 2025 मध्ये शेअरची किंमत 185.20 रुपये होती. शेअरसाठी हा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		