
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या महारत्न कंपनी दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. या सरकारी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2 टक्के वाढीसह 121.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या कंपनीचे शेअर्स अफाट तेजीत धावत आहेत. आज शुक्रवार दिनांक 1 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.87 टक्के वाढीसह 132.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या या कंपनीचे शेअर्स आपल्या 6 वर्षांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत.
28 एप्रिल 2017 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 117.13 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या स्टॉकमध्ये वाढीचे कारण म्हणजे, भेल कंपनीला एनटीपीसी कंपनी एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. म्हणून भेल कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार कंपनीला NTPC कंपनीकडून 15530 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला छत्तीसगडमधील लारा याठिकाणी औष्णिक ऊर्जा प्रकल्प बांधायचा आहे. या प्रकल्पामध्ये BHEL कंपनी 2×800 MW क्षमतेचा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्रोजेक्ट उभारणार आहे.
BHEL ने नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, या प्रोजेक्टमध्ये 2 युनिट असणार आहेत. युनिट -1 चे काम पूर्ण करण्याची मिळत 48 महिने असेल. आणि युनिट -2 चे काम पूर्ण करण्याची मिळत 52 महिने असेल. NHPC कंपनीकडून देण्यात आलेल्या या ऑर्डरचे एकूण मूल्य 2242 कोटी रुपये आहे. मागील एका महिन्यात BHEL कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील सहा महिन्यात भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 73 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. तर 1 सप्टेंबर 2022 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 60.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 31 ऑगस्ट 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 121.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.