
BHEL Share Price | भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड सरकारी मालकीच्या कंपनीचे शेअर्स जोरदार कामगिरी करत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 4.14 टक्के वाढीसह 119.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. आज देखील हा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करत आहे. आज गुरूवार दिनांक 31 ऑगस्ट 2023 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.80 टक्के वाढीसह 119.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
स्टॉक वाढीचे कारण
शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला अदानी पॉवर कंपनीच्या एका युनिटकडून 4,000 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर देण्यात आली आहे. ही बातमी आल्यानंतर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, “भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीला अदानी पॉवर लिमिटेड कंपनीकडून 4,000 कोटी रुपयेची ऑर्डर मिळाली, आणि शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी या सकारात्मक बातमीचा फायदा घेण्याचे ठरवले, म्हणून स्टॉक मध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे.” तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसात या कंपनीचे शेअर्स 120 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.
शेअरची कामगिरी
अदानी पॉवर कंपनीची उपकंपनी असलेल्या महान एनर्जी लिमिटेड कंपनीने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या सरकारी कंपनीला ही ऑर्डर दिली आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारत हेवी इलेक्ट्रिकल्स कंपनीचे शेअर्स 3.49 टक्के वाढीसह 118.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 103.23 टक्के नफा मिळवून दिला आहे. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 49.06 टक्के परतावा कमावून दिला आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 54.75 रुपये होती. आणि कंपनीचे एकूण बाजार भांडवल 41,314.68 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.