15 December 2024 2:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
x

EPFO Online Claim | पगारदारांनो! या चुका टाळा नाहीतर EPF चे पैसे विसरा, जाणून घ्या फॉर्मचा योग्य तपशील

EPFO Online Claim

EPFO Online Claim | नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ईपीएफ खात्यात पैसे जमा होणे फार महत्वाचे मानले जाते. आपल्या पगारातील एक ठरावीक रक्कम दर महिन्याला कट होते. जमा रक्कम आपली एकप्रकारची सेवींग असते. हे पैसे आपण रिटाअरमेंटनंतर किंवा काही महत्वची कामे असल्यास वापरू शकतो.

ईपीएफ खात्यातून पैसे काढणे फार सोपे आहे. मात्र पैसे काढण्यासाठी म्हणजे क्लेम करण्यासाठी काही फॉर्म भरावे लागतात. फॉर्म भरताना काही व्यक्तींकडून अगदी शुल्लक चुका होतात आणि क्लेम करूनही त्यांना पैसे मिळत नाहित. त्यामूळे आज पीएफ खात्यातील पैसे काढताना क्लेम फॉर्म भरताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याची माहिती जाणून घेऊ.

चूकीची माहिती देऊ नका :
तुमचा ईपीएफ फॉर्म रद्द होण्यामागे तुमचा निष्काळजीपणा देखील असू शकतो. तूम्ही तुमची व्यवस्थित माहिती न भरल्यामुळे तुमचा फॉर्म सरळ रद्द होऊ शकतो. त्यामुळे सर्व डॉक्युमेंट्सवरची माहिती काळजीपूर्वक वाचून फॉर्म भरा.

सारखी नावं असणं गरजेचं :
बऱ्याच वेळा असं होतं की, आधार कार्डवर नमूद असलेलं नाव हे EPFO पोर्टलवर नोंदवलेल्या नावापेक्षा वेगळं असू शकत. अशावेळी गांगरून जाऊ नका. यावर तुम्ही अर्जासोबत संयुक्त घोषणापत्र सादर करून तुमची चूक दुरुस्त करू शकता. परंतु EPFO रेकॉर्डमध्ये नोंदवलेली जन्मतारीख वेगळी किंवा चुकीची असेल तर तुमचा फॉर्म नाकारला जाऊ शकतो.

नोकरी संबंधित सर्वात महत्त्वाची गोष्ट :
क्लेम फॉर्म भरताना या गोष्टीकडे जरूर लक्ष द्या. पैसे काढण्यासाठी फॉर्म भरताना तुमच्या नोकरीची जॉइनिंग झालेली तारीख आणि नोकरी सोडतीची तारीख बरोबर असेल तरच तुमचं काम यशस्वी होईल. जर तारीख चुकीची असेल तर तुमचा फॉर्म भरला जाणार नाही.

UAN आधारकार्डला लिंक असणे अनिवार्य :
क्लेम मिळवण्यासाठी केवायसी तपशील अपूर्ण आणि खोटा असेल तर, तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो. त्याचबरोबर UAN ला तुमचं आधारकार्ड लिंक असणे गरजेचे आहे. तरच तुमचं काम यशस्वीरीत्या होईल.

जॉईंट अकाउंटचा उपयोग करू नका :
बऱ्याचदा सर्व माहिती व्यवस्थित भरून सुद्धा फॉर्म रिजेक्ट केला जातो. याचं कारण म्हणजे जॉइंट अकाउंट. बऱ्याच पती-पत्नीचं जॉईंट अकाउंट ओपन केलं जातं. परंतु क्लेमच्या वेळी म्हणजेच पैसे काढण्याच्या वेळी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबरोबर खात्यामध्ये जॉईंट आहात या कारणामुळे तुमचा फॉर्म रद्द करण्यात येतो.

News Title : EPFO Online Claim Status check details 31 August 2024.

हॅशटॅग्स

#EPFO Online Claim(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x