 
						Bisil Plast Share Price Today | ‘बिसिल प्लास्ट लिमिटेड’ या पॅकेजिंग कंपनीच्या शेअरमध्ये मागील सहा महिन्यापासून जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. आज सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.76 टक्के वाढीसह 2.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील काही दिवसांपासून ‘बिसिल प्लास्ट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स दररोज अप्पर सर्किट तोडत आहेत. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 2.20 रुपये आहे. तर शेअरची नीचांक किंमत पातळी 0.33 रुपये होती. या मायक्रो स्मॉल कंपनीचे एकूण बाजार भांडवल 11.35 कोटी रुपये आहे. (Bisil Plast Limited)
गुंतवणुकीवर परतावा :
‘बिसिल प्लास्ट लिमिटेड’ कंपनीच्या शेअरने मागील तीन महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 483.33 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 117.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन आठवड्यांत ‘बिसिल प्लास्ट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 51.08 टक्के वधारले आहेत. मागील एका आठवड्यात ‘बिसिल प्लास्ट लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 26.51 टक्के वाढले आहेत. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर्स 20.88 टक्के मजबूत झाले आहे. ‘बिसिल प्लास्ट लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची सर्वकालीन उच्चांक पातळी किंमत 20.40 रुपये होती.
कंपनीचे तिमाही निकाल :
‘बिसिल प्लास्ट लिमिटेड’ कंपनीने अद्याप आपले मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले नाही. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ‘बिसिल प्लास्ट लिमिटेड’ कंपनीने 1.87 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मात्र त्यात कंपनीने 15 लाख निव्वळ नफा कमावला होता. ‘बिसिल प्लास्ट लिमिटेड’ कंपनी 25 सप्टेंबर 1986 रोजी नोंदवण्यात आली होती. 17 मार्च 2006 रोजी कंपनीने आपले नाव बदलून ‘बिस्लेरी गुजरात लिमिटेड’ आणि नंतर 7 एप्रिल 2008 रोजी ‘बिसिल प्लास्ट लिमिटेड’ असे बदलेले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		