28 April 2024 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
x

Post Office e-Passbook | पोस्ट ऑफिस ग्राहकांचे काम होणार सोपे, पोस्टाने ग्राहकांसाठी सुरु केली ही फयदेशीर सेवा

Post Office Passbook

Post Office e-Passbook | आता सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटलायझेशन होत आहे. मग यात पोस्ट ऑफिस तरी मागे कसे राहील. तुम्ही पोस्टाच्या विविध योजनेत गुंतवणूक करत असाल तर आता पोस्टाने तुमच्यासाठी एक खास सेवा सुरु केली आहे. या सेवेने तुम्ही तुम्हाला हवे तेव्हा तुमच्या प्रत्येक खात्याचा तपशील पाहू शकणार आहात. कारण पोस्टाचे इपासबूक आता तुमचे काम सोपे करणार आहे. अनेक व्यक्ती पोस्टाच्या विविध योजनेत गुंतवणूक करतात. यात पैसे भरण्यासाठी काही व्यक्ती ऑनलाइन पेमेंटचा पर्याय निवडतात. मात्र याचा तपशील जाणून घेण्यासाठी पोस्टात जाउन पासबुक प्रिंट करावे लागते. मात्र आता इपासबूकच्या सुविधेने हे काम सोपे होत आहे.

यात ऑनलाइन सेवेत आधी फक्त मिनि स्टेटमेंट मिळवता येत होते. मात्र आता अनेक बॅंकांनी त्यांची इपासबूकची सेवा सुरु केली आहे. त्याच प्रमाणे पोस्टाने देखील ही सेवा सुरु केली आहे. यावर तुम्हाला मिनी स्टेटमेंटसह बॅंकेचे विविध ट्रांजेक्शन तुमच्या इपासबूकवर पाहता येणार आहेत. यासाठी तुमच्याकडे नोंदणीकृत नेट बॅंकींग किंवा मोबाइल बॅंकींग क्रमांक असायला हवा. याच्या सहाय्याने तुम्ही कधीही आणि कोठेही तुमचे पासबुक तपासू शकता. यासाठी काही स्टेप्स फॉलो करुन त्याचे ऍक्सेस मिळवता येतील.

पुढील स्टेप्स नुसार मिळवा ऍक्सेस
* आधी पोस्टऑफिसच्या बेवसाइटवर किंवा ऍपमध्ये लॉगइन करा.
* त्यात तुमचा लिंक असलेला संपर्क क्रमांक टाका.
* सर्व माहिती भरा आणि गो बटनावर क्लिक करा.
* त्यानंतर तुमच्या अकाउंटचा डॅशबोर्ड शो होईल.
* यात बॅलेन्स चेक आणि स्टेटमेंट असे दोन पर्याय मिळतील.
* यात दोन्ही पर्याय निवडताना कालावधी देखील दिसेल.
* तुम्ही योग्य तो कालावधी निवडून त्याचे तपशील पाहू शकता.

यात तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही 1800-425-2440 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता. याचा कालावधी सकाळी ९ ते सायंकाळी ६ असा आहे. तसेच [email protected] या मेल आयडीवर देखील तुमचे प्रश्न विचारू शकता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Post Office e-Passbook Post for customers check details on 26 April 2023.

हॅशटॅग्स

Post Office Passbook(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x