
BLS International Share Price | बीएलएस इंटरनॅशनल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये, बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शरव आठ टक्क्यांच्या वाढीसह 283 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 11650 कोटी रुपये आहे. BLS इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 302 रुपये होती. तर नीचांकी किंमत पातळी 149 रुपये होती.
मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 1.52 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी बीएलएस इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 0.035 टक्के घसरणीसह 282.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील 6 महिन्यांत, BLS इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 180 रुपये या नीचांक किमतीवरून 60 टक्के वाढले आहेत. BLS इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्स 150 रुपये किंमत स्पर्श केल्यावर आपल्या गुंतवणूकदारांना 70 टक्के नफा मिळवून दिला होता. 3 एप्रिल 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 7 रुपये नीचांकी किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या नीचांक किमतीवरून गुंतवणूकदारांनी तब्बल 3500 टक्के नफा कमावला आहे.
बीएलएस इंटरनॅशनल कंपनीला आयुष्मान भारत योजनेसाठी उत्तर प्रदेश राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये काम करण्याची परवानगी मिळाली आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या आयटी प्लॅटफॉर्मवर आयुष्मान भारत कार्डवर प्रक्रिया करण्याचे काम बीएलएस इंटरनॅशनल कंपनीला देण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत, बीएलएस इंटरनॅशनल कंपनी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या पॅनेलमध्ये सामील करण्यात आली आहे. यासह ही कंपनी आपल्या ग्राहकांना आवश्यक ई-गव्हर्नन्स सेवा देखील प्रदान करणार आहे.
बीएलएस इंटरनॅशनल कंपनीने सेबी दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीला उत्तर प्रदेश राज्यातील औरैया, इटावा, कानपूर देहात, प्रतापगढ, कानपूर सिटी, प्रयागराज, फारुखाबाद, फतेहपूर, कन्नौज आणि कौशांबी या शहरात सेवा प्रदान करण्याचे कंत्राट मिळाले आहे.
BLS इंटरनॅशनल लिमिटेड या आउटसोर्सिंग सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. ही कंपनी विविध देशांच्या सरकारांना आणि संस्थांना राजनैतिक कार्यासाठी आउटसोर्सिंग सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.