
Blue Star Share Price | जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘ब्लू स्टार’ या एअर कंडिशनर, एअर कूलर आणि वॉटर प्युरिफायर बनवणाऱ्या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मजबूत लाभ देण्याची तयारी केली आहे. ‘ब्लू स्टार’ ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची शक्यता आहे.
कंपनीने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, गुरुवार दिनांक 4 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या संचालकांच्या बैठकीत गुंतवणूकदारांना बोनस शेअर वाटप करण्याच्या प्रस्तावावर चर्चा होऊ शकते. या बैठकीत कंपनीचे मार्च 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल तपासले जातील. मंगळवार दिनांक 2 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.69 टक्के घसरणीसह 1,470.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
18 रुपये ते 1400 रुपयेचा प्रवास :
9 मे 2003 रोजी ब्ल्यू स्टार कंपनीचे शेअर्स 17.98 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1482 रुपये किमतीवर पोहचले आहेत. या काळात ब्लू स्टार कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 8140 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 9 मे 2003 रोजी ब्लू स्टार कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 82.43 लाख रुपये झाले असते.
3 वर्षांत दिला 230 टक्के परतावा :
ब्लू स्टार कंपनीच्या स्टॉकने मागील 3 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 233 टक्के परतावा कमावून दिला आहे. 3 एप्रिल 2020 रोजी ब्लू स्टार कंपनीचे शेअर्स 443.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1482 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ब्लू स्टार कंपनीच्या शेअरनी या वर्षी आतापर्यंत 24 टक्के परतावा दिला आहे. ब्लू स्टार कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1535.50 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 860 रुपये होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.