
Bondada Share Price | बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या IPO चे दोन महिन्यांपूर्वी 75 रुपये किमतीवर पदार्पण झाले होते. अवघ्या दोन महिन्यात या कंपनीचे शेअर्स 350 रुपयेच्या पार गेले आहेत. बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 333.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, दूरसंचार पायाभूत सुविधा प्रदान करणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेड कंपनीने बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीला 381 कोटी रुपये मूल्याचे कंत्राट दिले आहे. आज शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी बोंदाडा इंजिनिअरिंग स्टॉक 8.08 टक्के वाढीसह 360.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बोंदाडा इंजिनीअरिंग कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीला भारत संचार निगम लिमिटेड कंपनीने ऑपरेशन्स आणि मेंटेनन्स संबंधित काम करण्यासाठी कंत्राट दिले आहे. या कराराची मुदत पाच वर्ष असेल.
बीएसएनएल कंपनीकडून मिळालेल्या या कॉन्ट्रॅक्टचे एकूण मुल्य 381.27 कोटी आहे. बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 142.50 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 720 कोटी रुपये आहे.
बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचा IPO 75 रुपये किमतीवर शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. आता या कंपनीच्या शेअरची किंमत आपल्या IPO किमतीच्या तुलनेत 310 टक्के वाढली आहे. 30 ऑगस्ट 2023 रोजी बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 142.50 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. 2 नोव्हेंबर रोजी या कंपनीचे शेअर्स 333.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 75 रुपये या आपल्या IPO किंमतीच्या तुलनेत 310 टक्के मजबूत झाले आहेत. बोंदाडा इंजिनिअरिंग कंपनीचा IPO एकूण 112.28 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 100.05 पट अधिक सबस्क्राइब झाला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.