Bonus Money | कंपनीकडून मिळणारा बोनस म्हणजे तुमचा एक पगार असतो का?, कोणाला किती बोनस द्यावा हे कसे ठरते पहा

Bonus Money | दिवाळीत प्रत्येक कर्मचा-याला बोनसची आशा लागलेली असते. शासकीय असो अथवा खासगी सर्वच ठिकाणी दिवाळी बोनस दिला जातो. यात तुम्हाल एकरकमी पैसे मिळतात. त्यामुळे प्रत्येक कर्मचा-याची दिवाळी गोड होते. बोनस आपण आधिक छान काम करावे तसेच कर्मचा-याला दिलासा मिळावा म्हणून कामाच्या मोबदल्यात दिला जातो. अशात तुम्हाला मिळणारा हा बोनस तुमच्याच पगारातून दिला जातो की, वेगळा असतो याची तुम्हाला माहिती आहे का?

अनेक व्यक्तींचा असा समज आहे की, बोनस हा आपल्याला आपल्या पगाराव्यतिरिक्त दिला जातो. मात्र तसे नसते. तुमचा बोनस हा तुमच्याच पगारातील रकमेतून तुमच्या खात्यात जमा केला जातो. अनेक व्यक्ती हे पैसे योजनेत गुंतवण्याचा विचार करतात. तर काही जण आपली हौस मौज पुरवण्यासाठी याचा वापर करतात.

ऑफर लेटरवर लिहिलेले नसले तरी
बोनस हा फक्त दिवाळीलाच दिला जातो असे नाही. तुमच्या ऑफर लेटरवर लिहिलेले नसले तरी तुम्ही कंपनीसाठी जास्तीचा नफा मिळवला तर त्याचे बक्षिस म्हणून तुम्हाला बोनस मिळतो. तसेच कंपनीच्या परफॉर्मन्सवर तो आधारीत असतो.

कोणतीही कंपनी बोनस देऊ शकते असे नाही. त्यासाठी काही नियम आणि अटींचे पालन करावे लागते.  जेव्हा एखाद्या कंपनीतील कर्मचारी संख्या वीस किंवा त्याहून अधिक असते तेव्हा ती कंपनी बोनस देऊ शकते. संपूर्ण भारतात १९६५ च्या पेमेंट ऑफ बोनस या कायद्या अंतरर्गत हे नियम लागू होतात. जेव्हा तुम्ही २० हून जास्त कर्मचारी असलेल्या अस्थापनेत काम करता तेव्हा तुम्हाला तुमचा बोनस मागण्याचा अधिकार असतो.

या नियमात कंपनीला जास्तीत जास्त २० टक्के तर कमितकमी ८.३३ टक्के दराने बोनस द्यावाच लागतो. जेव्हा कोनत्याही चुकीमुळे कर्मचा-याला त्याच्या कामावरून बडतर्फ केले जाते. तेव्हा त्याला बोनस मागण्याचा अधिकार नसतो. ज्या कर्मचा-यांना २१,००० पेक्षा क मी पगार आहे अशा कर्मचा-याला आधी बोनस द्यावा लागतो. यात ७ हजार x ८.३३/ १०० आणि बेसिक सॅलरी +  डीए अशी रक्कम मिळते. म्हणजे ८.३३ टक्के पगाराची रक्कम बोनस स्वरुपात खात्यात जमा होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

 News Title : Bonus Money Is a bonus your salary How is it decided how much bonus to pay 21 October 2022.