3 May 2024 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | फायदाच फायदा! दररोज फक्त 250 रुपयांची बचत करा, मिळेल 24 लाख रुपये परतावा 8th Pay Commission | खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच 8'वा वेतन आयोग लागू होणार, पगारात किती वाढ होणार? Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार?
x

Multibagger Stocks | 5 दिवसात 91 टक्क्यांचा परतावा देणाऱ्या स्टॉकची यादी, गुंतवणूकदार झाले मालामाल, लिस्ट सेव्ह करा

Multibagger stocks

Multibagger Stocks | शेअर बाजारातील अस्थिर आणि गोंधळाच्या वातावरणामुळे 15 ऑक्टोबर 2022 रोजी आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजार अर्ध्या टक्क्यांनी गडगडला होता. पाश्चिमात्य देशात आर्थिक मंदी येण्याची भीती असताना कमी प्रॉफिट आणि कमजोर आर्थिक डेटा यांचा शेअर बाजारावर विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. BSE SENSEX मध्ये 271 अंकांची घसरण झाली असून सध्या तो 57,920 वर ट्रेड करत आहे. आणि निफ्टी-50 मध्ये 129 अंकांची घसरण झाली असून सध्या तो 17,186 वर ट्रेड करत आहे. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 2.8 टक्क्यांनी घसरला होता आणि स्मॉलकॅप 100 निर्देशांकात 1.7 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. यादरम्यान असे 5 स्टॉक आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या 5 दिवसात 91.5 टक्क्यांचा परतावा कमावून दिला आहे.

जेनिथ एक्सपोर्ट :
Zenith Exports ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 81.27 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यात अवघ्या 5 ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 91.54 टक्क्यांनी वाढला आहे. हा स्टॉक फक्त 5 दिवसांपूर्वी 76.80 रुपयांवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन स्टॉक सध्या 147.10 रुपयांवर ट्रेड करत आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या शेअरमध्ये 10 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती, आणि स्टॉक या वाढीसह 150.60 रुपयांवर बंद झाला होता. या स्टॉकमध्ये जर तुम्ही 1 लाख रुपयेची गुंतवणूक केली असती तर 91.54 टक्के परताव्यासह तुमच्या एक लाख रुपयांवर आता 1.91 लाखांपेक्षा जास्त परतावा मिळाला असता. स्मॉल कॅप कंपनीत गुंतवणूक करणे जोखमीचे असते, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.

पॅन इलेक्ट्रॉनिक्स:
पॅन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीनेही मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचा शेअर 28.40 रुपयांवर ट्रेड करत होता, त्यात वाढ होऊन सध्या स्टॉक.45.20 रुपयांवर पोहोचला आहे. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांनी अवघ्या काही दिवसात या शेअर्समधून 59.15 टक्के नफा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 18.32 कोटी रुपये आहे. 5 दिवसात या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना 59.15 टक्केचा मल्टीबॅगर परतावा कमावून दिला जो FD सारख्या पर्यायांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5.85 टक्क्यांच्या उसळीसह 45.20 रुपयांवर ट्रेड करत होता.

UH झवेरी:
UH झवेरी कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना मजबूत नफा मिळवून दिला आहे. मागील आठवड्यात या स्टॉकमध्ये 48.85 टक्के वाढ पाहायला मिळाली होती. हा शेअर अवघ्या 36.95 रुपयांवरून वाढून 55 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या शेअरने पाच दिवसात आपल्या गुंतवणूकदारांना 48.85 टक्केचा बंपर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 33.70 कोटी रुपये आहे. शुक्रवारचा ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 7.84 टक्क्यांच्या मजबूतीसह 55 रुपयांवर ट्रेड करत होता.

स्टॅनपॅक्स इंडिया:
स्टॅनपॅक्स इंडिया कंपनीने मागील आठवड्यात कमालीची कामगिरी केली आहे. आणि आपल्या गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळवून दिला आहे. हा स्टॉक पाच दिवसा आधी 10.55 रुपयांवर ट्रेड करत होता, तो वाढून आता 15.46 रुपयांवर गेला आहे. या शेअरमध्ये गुंतवणूक करून लोकांनी 46.54 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 9.42 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह 15.46 रुपयांवर ट्रेड करत होता.

अॅडव्हान्स सिंटॅक्स :
अॅडव्हान्स सिंटॅक्स कंपनीने मागील आठवड्यात गुंतवणूकदारांना छप्पर फाड परतावा दिला आहे. हा स्टॉक फक्त 10.94 रुपयांवर ट्रेड करत होता, तो आता 16.03 रुपयांवर गेला आहे. म्हणजेच या शेअरमध्ये गुंतवणूक करून लोकांनी 46.53 टक्के परतावा कमावला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 17.79 कोटी रुपये आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा शेअर 5 टक्क्यांच्या वाढीसह 16.03 रुपयांवर ट्रेड करत होता. मागील एका महिन्यात BSE Sensex मध्ये 2.06 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत या स्टॉकमध्ये 1.32 टक्क्यांची मजबूत वाढ झाली आहे. 2022 मध्ये आतापर्यंत हा स्टॉक 2.13 टक्क्यांनी पडला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Multibagger stocks has given huge returns in last 5 day’s in 17 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x