
Bonus Share News | शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी अच्युत हेल्थकेअर लिमिटेड कंपनी शेअर 65 रुपयांवरून 9% वाढून 71 रुपयांवर पोहोचला होता. कारण अच्युत हेल्थकेअर लिमिटेड कंपनीने (BOM: 543499) फ्री बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची घोषणा केली होती. (अच्युत हेल्थकेअर लिमिटेड कंपनी अंश)
शेअरची सध्याची स्थिती
सोमवार 21 ऑक्टोबर रोजी हा शेअर 20 टक्के वाढून 79.50 रुपयांवर पोहोचला होता. अच्युत हेल्थकेअर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 134 कोटी रुपये आहे. मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी हा शेअर 10 टक्के घसरून 71.55 रुपयांवर पोहोचला होता.
Achyut Healthcare Share Price
अच्युत हेल्थकेअर लिमिटेड कंपनी शेअर हा एक SME स्टॉक आहे. अच्युत हेल्थकेअर लिमिटेड कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त आहे. अच्युत हेल्थकेअर लिमिटेड कंपनी शेअर 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 40.23 रुपयांवरून 79.50 रुपयांवर पोहोचला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 39% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 52% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 37% परतावा दिला आहे.
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी
अच्युत हेल्थकेअर लिमिटेड कंपनीने नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सला मंजुरी दिली आहे. तसेच अच्युत हेल्थकेअर लिमिटेड कंपनीने ४:१० या प्रमाणात बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.