
Bonus Share News | शुक्रवारी आनंद राठी वेल्थ लिमिटेड कंपनी शेअर तेजीत होता. शुक्रवार, 10 जानेवारी 2025 रोजी आनंद राठी वेल्थ कंपनी शेअर 4.37 टक्क्यांनी वाढून 4,116 रुपयांवर पोहोचला होता. एक फायद्याची अपडेट आल्यानंतर आनंद राठी वेल्थ कंपनी शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. कारण, एक फायद्याची अपडेट कंपनी गुंतवणूकदारांना लवकरच फ्री बोनस शेअर्स देणार आहे.
काय म्हणाली कंपनी?
आनंद राठी वेल्थ लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, आनंद राठी वेल्थ लिमिटेड कंपनी संचालक मंडळाची बैठक 13 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. या बैठकीत आनंद राठी वेल्थ लिमिटेड कंपनी संचालक मंडळ सदस्य इतर गोष्टींसह बोनस शेअर्सच्या प्रस्तावावर विचार करणार आहेत. मागील पाच वर्षांत आनंद राठी वेल्थ शेअरने ६०० टक्के परतावा दिला आहे.
कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल
दुसऱ्या तिमाहीत आनंद राठी वेल्थ लिमिटेड कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 32 टक्क्यांनी वाढून 76.3 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 57.7 कोटी रुपये इतका होता. आनंद राठी वेल्थ लिमिटेड कंपनीच्या उत्पन्नात ३२ टक्के वाढ होऊन तो आकडा २४९.६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत १८९.१ कोटी रुपये इतका होता.
कंपनी शेअर्सची सध्याची स्थिती
आनंद राठी वेल्थ लिमिटेड कंपनीचे मार्केट कॅप 17,372 कोटी रुपये आहे. आनंद राठी वेल्थ कंपनी शेअरची 52 आठवड्यांतील उच्चांकी पातळी 4,646 रुपये होती आणि 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 2,572.65 रुपये होती.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.