
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. रेमिडियम लाईफकेअर कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड डेट म्हणून 6 जुलै 2024 हा दिवस निश्चित केला आहे. ( रेमिडियम लाईफकेअर कंपनी अंश )
रेमिडियम लाईफकेअर कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना एका शेअरवर 1 रुपये दर्शनी मूल्याचे 3 बोनस शेअर्स मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने 28 जुलै 2023 रोजी देखील गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. त्यावेळी कंपनीने 5 शेअर्सवर 9 शेअर्स बोनस मोफत वाटप केले होते. आज सोमवार दिनांक 3 जून 2024 रोजी रेमिडियम लाईफकेअर स्टॉक 1.68 टक्के वाढीसह 78.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
1 सप्टेंबर 2023 रोजी रेमिडियम लाईफकेअर कंपनीचे शेअर्स स्प्लिट झाले होते. यावेळी कंपनीने आपले 10 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स 2 भागात विभाजित केले होते. त्यानंतर या कंपनीने 23 फेब्रुवारी 2027 रोजी आपले 5 रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स 5 तुकड्यात विभाजित केले होते. आणि आता कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत 1 रुपये किमतीवर आली होती.
मागील आठवड्यात शुक्रवारी रेमिडियम लाईफकेअर कंपनीचे शेअर्स 0.51 टक्क्यांच्या घसरणीसह 77.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने 9.9 टक्के वाढ नोंदवली आहे. मागील एका महिन्यात रेमिडियम लाईफकेअर कंपनीच्या शेअरमधे 24 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 179.66 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 66.83 रुपये होती. रेमिडियम लाईफकेअर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 779.18 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.