 
						Bonus Share News | रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. स्टॉक वाढीचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. सोमवारी रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. ( रेमिडियम लाइफकेअर कंपनी अंश )
या बैठकीत आर्थिक निकालांबाबत आणि बोनस शेअर्सबाबत चर्चा करण्यात आली होती. रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणुकदारांना 3:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आज बुधवार दिनांक 29 मे 2024 रोजी रेमिडियम लाइफकेअर स्टॉक 4.02 टक्के वाढीसह 76.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
रेमिडियम लाईफकेअर कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्यासाठी 6 जुलै 2024 हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केला आहे. रेमिडियम लाइफकेअर कंपनी दुसऱ्यांदा बोनस शेअर्स वाटप करणार आहे. यापूर्वी कंपनीने 28 जुलै 2023 रोजी गुंतवणुकदारांना 9 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होत.
2019 पासून आतापर्यंत रेमिडियम लाइफकेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 12,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2018 पासून आतापर्यंत या कंपनीचे शेअर्स 16,000 टक्के वाढले आहेत. पाच वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 62 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. रेमिडियम लाइफकेअर कंपनीचे बाजार भांडवल 745.42 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		