12 December 2024 9:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यास मुदतवाढ...जाणून घ्या तारीख

ITR filing, deadline for FY 2019 20 extended, November 30

नवी दिल्ली, ४ जुलै : आयकर परतावे (ITR) भरण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षाचा परतवा भरता येणार असल्याने नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक खासगी कंपन्यांचे फॉर्म १६ अजूनही तयार नसल्याने परताव्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे आयकर विभागाने आधीची ३१ ऑक्टोबरची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली आहे.

२०१९-२० या आर्थिक वर्षाचा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. इन्कट टॅक्स भरण्याची मुदत पाच महिन्याने वाढवल्यामुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे. शनिवारी इन्कम टॅक्स विभागानं आपल्या अधिकृत ट्विटरद्वारे इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवल्याची माहिती दिली.

२०१९-२०२० या आर्थिक वर्षाचे आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी गुरुवारी आयकर खात्याने सेव्हिंग इन्वेस्टमेंटची तारीख ३१ जुलै असल्याचे जाहीर केले होते. याचा अर्थ या आर्थिक वर्षात ३१ जुलै २०२० पर्यंत करबचतीसाठी गुंतवणूक करता येणार आहे. म्हणजे ३१ जुलैपर्यंत आपण केलेली गुंतवणूक ३० नोव्हेंबरच्या रिटर्नमध्ये दाखवता येणार आहे. आयकरातून सवलत मिळण्यासाठी लाइफ इन्शुरन्स, ईपीएफ, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम याची माहिती आयकर रिटर्न भरताना करदात्यांने दिल्यास त्याला करात सवलत मिळणार आहे. २०१९-२०२० या वर्षातील टीडीएस आणि टीसीएस स्टेटमेंट पूर्ण करण्याची तारीखही १५ ऑगस्टपर्यंत आयकर खात्याने वाढवली आहे.

 

News English Summary: The Income Tax Department has announced a further extension to the deadline for filing income tax return (ITR) for the financial year (FY) 2019-20 to November 30.

News English Title: ITR filing deadline for FY 2019 20 extended till November 30 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Nirmala Sitharaman(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x