 
						Bonus Share News | सध्या जर तुम्ही भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल ही तर बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला व्हीएसटी इंडस्ट्रीज कंपनीबाबत माहिती देणार आहोत. या कंपनीने नुकताच आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी प्रथमच मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. आज शुक्रवार दिनांक 26 जुलै 2024 रोजी व्हीएसटी इंडस्ट्रीज स्टॉक 2.45 टक्के वाढीसह 4,090 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( व्हीएसटी इंडस्ट्रीज कंपनी अंश )
या कंपनीचा लाभांश वाटप करण्याचा ट्रॅक रेकॉर्ड मजबूत आहे. जून 2024 मध्ये देखील कंपनीने 150 रुपये लाभांश वाटप केला होता. एका वर्षभरापूर्वी देखील या कंपनीने आपल्या शेअरधारकांना 150 रुपये लाभांश दिला होता. यासह कंपनीने 2022 मध्ये 140 रुपये आणि 2021 मध्ये 114 रुपये लाभांश वाटप केला होता. शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार आणि उद्योगपती राधाकिशन दमाणी हे व्हीएसटी इंडस्ट्रीज कंपनीचे सर्वात मोठे शेअरधारक आहेत.
दमाणी आणि त्यांच्या गुंतवणूक कंपनीकडे व्हीएसटी इंडस्ट्रीज कंपनीचे 34 टक्के भागभांडवल आहेत. व्हीएसटी इंडस्ट्रीज ही कंपनी मुख्यतः सिगारेट आणि तंबाखूशी संबंधित उत्पादने बनवण्याचा व्यवसाय करते. ही कंपनी 1990 साली सुरू झाली होती. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 3,881.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आणि दिवसभरात हा स्टॉक 4100 रुपये किमतीवर पोहचला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		