
Bonus Share News | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. व्हीएसटी इंडस्ट्रीज या कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. व्हीएसटी इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवार दिनांक 25 जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. ( व्हीएसटी इंडस्ट्रीज कंपनी अंश )
बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा झाल्यावर हा स्टॉक 24 जुलै रोजी 16 टक्केपेक्षा जास्त घसरला होता. दिवसाअखेर हा स्टॉक 3883.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज गुरूवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी व्हीएसटी इंडस्ट्रीज स्टॉक 3.05 टक्के वाढीसह 3,999.95 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
व्हीएसटी इंडस्ट्रीज ही कंपनी पहिल्यांदाच आपल्या शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. या कंपनीचा लाभांश वाटप करण्याचा ट्रॅक रेकॉर्ड खूप चांगला आहे. व्हीएसटी इंडस्ट्रीज ही कंपनी 2020 पासून आपल्या गुंतवणूकदारांना 100 रुपयांपेक्षा जास्त लाभांश वाटप करत आली आहे. 2012 पासून या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 50 रुपयांपेक्षा जास्त लाभांश वाटप केला आहे. व्हीएसटी इंडस्ट्रीज कंपनीमध्ये राधाकिशन दमानी यांनी 53 लाखांपेक्षा जास्त शेअर्स म्हणजेच 3.47 टक्के भागभांडवल खरेदी करून मोठी गुंतवणूक केली आहे.
डेरिव्हेटिव ट्रेडिंग अँड रिसॉर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे व्हीएसटी इंडस्ट्रीज कंपनीचे 8,09,602 शेअर्स आहेत. तर ब्राइट स्टार इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे 40,07,118 शेअर्स आहेत. 2024 या वर्षात व्हीएसटी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची किंमत 14 टक्के वाढली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10.56 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात व्हीएसटी इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना फक्त 5.53 टक्के नफा दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.