15 December 2024 6:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Adani Wilmar Share Price | अदानी विल्मर सह हे 4 शेअर्स मालामाल करणार, फायद्याची अपडेट नोट करा

Adani Wilmar Share Price

Adani Wilmar Share Price | मंगळवारी संसदेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आला. त्यामध्ये एलटीसीजी, एससीटीजी आणि सुरक्षा व्यवहार कर वाढवण्याच्या घोषणेनंतर शेअर बाजारामध्ये विक्रीचा दबाव वाढला. सर्वसाधारण अर्थसंकल्पात कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. तसेच कोळंबी माशांच्या साठ्यासाठी प्रजनन केंद्रांचे जाळे उभारण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

शेअर बाजाराने अर्थसंकल्पावर फारशी सकारात्मक प्रतिक्रिया दिली नसली तरी, अशा काही कंपन्या आहेत, ज्यांना अर्थसंकल्पातील तरतुदींचा फायदा होऊ शकतो. सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छित असाल तर, हे शेअर्स तुमच्यासाठी सर्वोत्तम शेअर्स ठरू शकतात.

टायटन :
भारत सरकारने सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरील कस्टम ड्युटी 15 टक्केवरून 6 टक्के केली आहे. अर्थसंकल्पातील सरकारच्या या निर्णयाचा फायदा टायटन कंपनीला होणार आहे. कारण या कंपनीच्या उत्पादनातील 87 टक्के भाग दागिन्यांचा आहे. आज गुरूवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 2.18 टक्के घडारणसह 3,402.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

टीमलीज सर्व्हिस :
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केली आहे की, पुढील 5 वर्षात एक कोटी तरुणांना टॉप भारतीय कंपन्यांमध्ये इंटर्नशिप देण्यात येणार आहे. या निर्णयाचा फायदा टीमलीज सर्व्हिसेस या एचआर सल्लागार कंपनीला होणार आहे. आज गुरूवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.94 टक्के घसरणीसह 3,297.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

बोरोसिल रिन्युएबल्स :
देशांतर्गत सौर काच उत्पादकांना संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात सौर काचेवरील सीमा शुल्कात वाढ केली आहे. याव्यतिरिक्त, सौर सेल आणि मॉड्यूल्सच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही अतिरिक्त भांडवली वस्तूंवरील शुल्क माफ करण्यात आले आहे. या घोषणेचा थेट फायदा सोलर ग्लास बनवणाऱ्या बोरोसिल रिन्युएबल्स कंपनीला होऊ शकतो. आज गुरूवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 3.49 टक्के घसरणीसह 540.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

अदानी विल्मर :
अर्थसंकल्पात भारत सरकारने कडधान्ये आणि तेलबियांमध्ये स्वयंपूर्णता मिळविण्यासाठी उत्पादन, साठवणूक आणि विपणन व्यवस्था मजबूत करण्याचे आश्वासन दिले आहे. करेल. याचा फायदा अदानी विल्मर कंपनीला होऊ शकतो. ही कंपनी सोयाबीन तेलासह अनेक प्रकारचे तेल तयार करते. आज गुरूवार दिनांक 25 जुलै 2024 रोजी हा स्टॉक 0.69 टक्के घसरणीसह 322.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Wilmar Share Price NSE Live 25 July 2024.

हॅशटॅग्स

#Adani Wilmar Share Price(50)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x