
Bonus Share News | बीएन राठी सिक्युरिटीज लिमिटेड कंपनी फ्री बोनस शेअर्स देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बीएन राठी सिक्युरिटीज कंपनीने स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख देखील जाहीर केली आहे. फ्री बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख जानेवारी महिन्यातील आहे. शुक्रवार, 03 जानेवारी 2025 रोजी बीएन राठी सिक्युरिटीज शेअर 2.45 टक्क्यांनी घसरून 267 रुपयांवर पोहोचला होता.
बोनस शेअर्ससाठी रेकॉर्ड तारीख जाहीर
बीएन राठी सिक्युरिटीज कंपनीने स्टॉक एक्सचेंजने फायलिंगमार्फत माहिती देताना म्हटले आहे की, ‘बीएन राठी सिक्युरिटीज कंपनी संचालक मंडळाने 24 जानेवारी 2025 ही बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. कंपनी संचालक मंडळाने 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या प्रत्येक शेअरचे 10 भागांमध्ये विभाजन करण्यास देखील मंजुरी दिली आहे.
या स्टॉक स्प्लिटनंतर बीएन राठी सिक्युरिटीज कंपनी शेअर्सची फेस व्हॅल्यू 1 रुपयापर्यंत खाली येईल. 24 जानेवारी 2025 पर्यंत ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात बीएन राठी सिक्युरिटीज कंपनीचे बोनस शेअर्स जमा होईल.
शेअरने किती परतावा दिला
बीएन राठी सिक्युरिटीज शेअरने गेल्या 6 महिन्यांत 80 टक्के परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने १७६ टक्के परतावा दिला आहे. गेल्या तीन वर्षांत बीएन राठी सिक्युरिटीज शेअरने ६०० टक्के परतावा दिला आहे. तर गेल्या 5 वर्षात या शेअरने 1800 टक्के परतावा दिला आहे. बीएन राठी सिक्युरिटीज कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 291 रुपये होता. बीएन राठी सिक्युरिटीज कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 277 कोटी रुपये आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.