
Bonus Shares | जीएम ब्रुअरीज या मद्य उत्पादक कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत वाढत आहेत. नुकताच या कंपनीने आपल्या शेअरधारकांना 1:4 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना 4 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत देणार आहे. ( जीएम ब्रुअरीज कंपनी अंश )
बोनस शेअर्सच्या घोषणेनंतरही गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या घसरणीसह 741.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी जीएम ब्रुअरीज स्टॉक 2.19 टक्के वाढीसह 759.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
गुरुवार दिनांक 4 एप्रिल रोजी जीएम ब्रुअरीज कंपनीचे शेअर्स 815.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. यापूर्वी 2014, 2016 आणि 2018 मध्ये देखील या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. या कंपनीने तीन वेळा आपल्या गुंतवणूकदारांना 1:4 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. म्हणजेच कंपनीने प्रत्येक 4 शेअर्सवर 1 बोनस शेअर वाटप केला होता. आता चौथ्यांदा देखील ही कंपनी 1:4 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप करणार आहे.
जीएम ब्रुअरीज कंपनीने अद्याप बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. जीएम ब्रेवरीज कंपनीच्या संचालक मंडळाने 7 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आपले जानेवारी-मार्च तिमाहीचे निकालही जाहीर केले आहेत. मार्च 2024 तिमाहीत जीएम ब्रुअरीज कंपनीने 86.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 35.1 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2024 तिमाहीत जीएम ब्रुअरीज कंपनीने 70 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 15 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. कंपनीने वार्षिक आधारावर 2.1 टक्क्यांच्या वाढीसह 159.2 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.