 
						Bonus Shares | सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मोफत बोनस शेअर्स मिळवू इच्छित असाल, तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. लवकरच ग्राउर अँड वील इंडिया लिमिटेड कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 26 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. आज शुक्रवार दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी ग्राउर अँड वील इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.96 टक्के वाढीसह 194.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. Grauer and Weil Share Price
ग्राउर अँड वील इंडिया लिमिटेड ही कंपनी मुख्यतः सरफेस फिनिशिंग क्षेत्रात व्यवसाय करणारी आघाडीची कंपनी मानली जाते. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 36.48 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 72.90 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षात ग्राउर अँड वील इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 280.65 टक्के नफा कमावून दिला आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ग्राउर अँड वील इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 163.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
डिसेंबर 2023 तिमाहीत ग्राउर अँड वील इंडिया लिमिटेड कंपनीने आपल्या महसूल संकलनात 13.61 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. या तिमाहीत कंपनीने 285.03 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 250.89 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 24.13 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.
डिसेंबर तिमाहीत कंपनीने 42.75 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 34.44 कोटी रुपये निव्वळ नफा झाला होता. या कंपनीचा EBITDA 52.31 कोटी रुपयेवरून वाढून 63.92 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर कंपनीने EBITDA मध्ये 22.19 टक्के पेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		