Bonus Shares | फुकट शेअर्स मिळवा! शेअरची किंमत फक्त 8 रुपये, रेकॉर्ड तारिख पूर्वी खरेदीला झुंबड, फायदा घ्या

Bonus Shares | इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विक्रीच्या दबावात अडकले होते. मात्र आज या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत धावत आहेत. इंटेग्रा एसेंशिया या पेनी स्टॉक कंपनीमध्ये एलआयसी सारख्या मोठ्या कंपनीने गुंतवणूक केली आहे. इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे एकूण बाजार भांडवल 332 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 8.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 5.30 रुपये होती. Integra Essentia Share Price

मागील 5 दिवसात इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 13.28 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 10 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. आज मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी इंटेग्रा एसेंशिया स्टॉक 15.54 टक्के वाढीसह 8.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

7 मार्च 2022 रोजी इंटेग्रा एसेंशिया कंपनीचे शेअर्स 1.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किंमत पातळीवरून हा पेनी स्टॉक 340 टक्के मजबूत झाला आहे. इंटेग्रा एसेंशिया कंपनीने आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. याची रेकॉर्ड तारीख म्हणून कंपनीने 11 जानेवारी 2024 हा दिवस निश्चित केला आहे. इंटेग्रा एसेंशिया कंपनी रेकॉर्ड तारीखच्या दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना 1 : 1 बोनस शेअर्स वाटप करणार आहे. सोमवार 27 नोव्हेंबर 2023 रोजी इंटिग्रा एसेन्शिया कंपनीच्या संचालक मंडळाने बोनस शेअर्सचा प्रस्ताव मंजूर केला होता.

14 सप्टेंबर 2023 रोजी इंटेग्रा एसेंशिया कंपनीने सेबीला माहिती दिली होती की, कंपनीला प्रीमियम तांदूळ आणि काजूचा पुरवठा करण्याची 12 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली होती. भारतातील अनेक मोठ्या निर्यातदारांनी इंटेग्रा एसेंशिया कंपनीला ही ऑर्डर दिली आहे.

2023 या वर्षात इंटेग्रा एसेंशिया कंपनीने जवळपास 270 कोटी रुपयेची सेल्स केली आहे. चालू आर्थिक वर्षात कंपनीच्या विक्रीत 15 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC सारख्या दिग्गज कंपनीने इंटेग्रा एसेंशिया कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले आहेत. इंटेग्रा एसेंशिया ही नवी दिल्लीस्थित कंपनी अन्न आणि ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Integra Essentia Share Price 02 January 2024.