 
						Bonus Shares | कृतिका वायर्स कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कृतिका वायर्स कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 27.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. Kritika Wires Share Price
कृतिका वायर्स या स्मॉल कॅप कंपनीने आपल्या शेअरधारकांना बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली होती. म्हणून गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली आहे. आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी कृतिका वायर्स स्टॉक 1.99 टक्के वाढीसह 28.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच कृतीका वायर्स लिमिटेड कंपनीने सेबीला माहिती दिली की, कंपनीने आपल्या शेअर धारकांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या पात्र शेअरधारकांना एका शेअरवर दोन शेअर्स मोफत देणार आहे.
सेबीच्या नियमांनुसार, कंपनीने बोनस शेअर्स वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 19 डिसेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे. म्हणजेच रेकॉर्ड तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे कृतिका वायर्स कंपनीचे शेअर्स असतील, त्यांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स मिळतील.
मागील पाच दिवसांत कृतिका वायर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 12.20 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 14.52 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यांत कृतिका वायर्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 50.41 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे कृतिका वायर्स कंपनीचे शेअर्स 120 टक्के मजबूत झाले आहेत. या वर्षात कृतिका वायर्स कंपनीचे शेअर्स 12 रुपयेवरून वाढून सध्याच्या किंमतीवर पोहोचले आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		