20 May 2024 4:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | 1660 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, पुढेही मालामाल करणार Patel Engineering Share Price | 58 रुपयांचा शेअर मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल 37 टक्केपर्यंत परतावा HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा
x

Adani Gas Share Price | 1 महिन्यात पैसे दुप्पट करणारा अदानी टोटल गॅस शेअरमध्ये घसरगुंडी सुरु, अजून किती घसरणार?

Adani Gas Share Price

Adani Gas Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजारात नफा वसुली पाहायला मिळाली होती. मात्र आज शेअर बाजारात जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी समूहाचा भाग असलेल्या बऱ्याच कंपनीचे शेअर्स विक्रीच्या दबावात ट्रेड करत होते. अदानी समूहातील सर्वात जास्त घसरलेल्या शेअरमध्ये अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स सामील होते.

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर 8.2 टक्के घसरणीसह 1,022.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. यासह अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 5.4 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 4.12 टक्के वाढीसह 1,045.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी समूहातील अदानी ग्रीन एनर्जी, अदानी विल्मर, अदानी पॉवर, एनडीटीव्ही, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी एंटरप्रायझेस या कंपन्याचे शेअर्स 0.06 टक्के ते 2 टक्के घसरणीसह ट्रेड करत होते. तर ACC कंपनीचे शेअर्स 0.33 टक्के वाढीसह आणि अंबुजा सिमेंट्स कंपनीचे शेअर्स 1.13 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल 14.16 लाख कोटी रुपये आहे.

मागील आठवड्यात अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 63.1 टक्के वाढले होते. अदानी ग्रुपमधील सर्वात जास्त नफा मिळवून देणारा शेअर अदानी ग्रीन एनर्जी कंपनीचा आहे. शुक्रवार दिनांक 8 डिसेंबर 2023 पर्यंत अवघ्या एका आठवड्यात अदानी ग्रीन एनर्जी स्टॉक 50.8 टक्के वाढला आहे. अदानी एनर्जी सोल्युशन्स कंपनीच्या शेअरने अवघ्या एका आठवड्यात गुंतवणूकदारांना 29.6 टक्के परतावा कमावून दिला आहे.

अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स एका आठवड्यात 23.9 टक्के, अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स एका आठवड्यात 23.8 टक्के वाढले होते. एनडीटीव्ही कंपनीचे शेअर्स एका आठवड्यात 22 टक्के आणि अदानी एंटरप्रायझेस कंपनीचे शेअर्स 19.6 टक्के वाढले होते. तर एसीसी कंपनीचे शेअर्स एका आठवड्यात 13.5 टक्के आणि अंबुजा सिमेंट्स कंपनीचे शेअर्स 12.7 टक्के वाढले होते. तर अदानी विल्मर कंपनीचे शेअर्स एका आठवड्यात 10.9 टक्के वाढले होते.

नुकत्याच भारतात तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. आणि त्यात भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळाले होते. यासह अमेरिकेतील एका संस्थेने अदानी समूहाला कथित गैरप्रकराच्या आरोपातून क्लीन चिट दिली होती. त्यामुळे अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ पाहायला मिळाली होती.

यूएस इंटरनॅशनल डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशने हिंडेनबर्ग रिसर्च फर्मच्या आरोपांचे खंडन केले आणि अदानी समूहाला क्लीन चिट दिली आहे. याच अमेरिकन एजन्सीने श्रीलंकेतील बंदर व्यवसायासाठी अदानी समूहाला 553 दशलक्ष डॉलर्स निधी देण्याची घोषणा देखील केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Gas Share Price NSE 14 December 2023.

हॅशटॅग्स

Adani Gas Share Price(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x