 
						Bonus Shares | MAS फायनान्शियल सर्व्हिसेस या वित्त क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 988.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर या कंपनीचे शेअर्स 1.08 टक्के वाढीसह 971.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. MAS Financial Services Share Price
मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित नफा वसुली पाहायला मिळत आहे. नुकताच MAS फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या शेअरधारकांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. आज गुरूवार दिनांक 18 जानेवारी 2024 रोजी MAS फायनान्शियल सर्व्हिसेस स्टॉक 0.59 टक्के घसरणीसह 966.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
एमएएस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या शेअरधारकांना 2 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. म्हणजेच ठरलेल्या रेकॉर्ड तारखेला MAS फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर 10 दर्शनी मूल्य असलेले दोन बोनस शेअर्स मोफत देणार आहे.
कंपनीने बोनस शेअर्स इश्यू करण्याची रेकॉर्ड डेट 22 फेब्रुवारी 2024 निश्चित केली आहे. बोनस शेअर्स कंपनीच्या संचालक मंडळाच्या मंजुरीच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत म्हणजे 16 मार्च 2024 रोजी किंवा त्यापूर्वी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील.
16 जानेवारी 2024 रोजी MAS फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने शेअर्स 992.05 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 995 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 680 रुपये होती.
लेटेस्ट शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार MAS फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीमध्ये 73.73 टक्के भाग भांडवल प्रवर्तकांनी होल्ड केले आहेत. तर 26.27 टक्के भाग भांडवल सार्वजनिक शेअर धारकांनी होल्ड केले आहेत. मागील सहा महिन्यांत MAS फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 26 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		