 
						BPCL Share Price | बीपीसीएल या महारत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. ब्रोकरेज फर्म जेफरीजने बीपीसीएल कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी स्टॉकची रेटिंग ‘अंडरपरफॉर्म’ वरून ‘BUY’ अशी अपग्रेड केली आहे. पुढील काळात या सरकारी कंपनीचे शेअर्स आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून देऊ शकतात.
मागील महिन्यांत तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 655 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 2024 रोजी बीपीसीएल स्टॉक 0.63 टक्के वाढीसह 658.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जेफरीज फर्मच्या तज्ञांनी बीपीसीएल कंपनीच्या शेअरबाबत सखोल विश्लेषण आपल्या अहवालात जाहीर केले आहे. भारतात लोकसभा निवडणुकीपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होत असतात. एकदा निवडणुक झाली की, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढतात. हा अनुभव तुम्हाला यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही मिळणार आहे.
त्यामुळे आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये बीपीसीएल सारख्या कंपन्यांचे मार्जिन सुधारण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर 2023 पासून आतापर्यंत जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा दर 75-85 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला होता. या अडचणीतून जग सावरत नाही तर, लाल समुद्रात नवीन वाद निर्माण झाला आहे. या तणावामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम पाहायला मिळत आहे.
या सर्व बाबींचा विचार करून जेफरीज फर्मने बीपीसीएल कंपनीच्या शेअर्सची टार्गेट प्राईस 415 रुपयेवरून वाढवून 890 रुपये निश्चित केली आहे. जर तुम्ही सध्याच्या किमतीवर बीपीसीएल स्टॉक खरेदी केला तर पुढील एका वर्षात तुम्हाला 115 टक्के परतावा सहज मिळू शकतो. सध्या बीपीसीएल कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वोच्च किंमत पातळीवर ट्रेड करत आहेत. मागील आठवड्यात या कंपनीचे शेअर्स 1.15 टक्क्यांनी मजबूत झाले होते.
मागील तीन महिन्यांत बीपीसीएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 65 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 83 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 102 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील दोन वर्षांत बीपीसीएल या सरकारी कंपनीच्या शेअर्सची किंमत 75 टक्के वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		